Home » Blog » अजित पवार अपघाताचा सीआयडी तीन अँगलने करणार तपास

अजित पवार अपघाताचा सीआयडी तीन अँगलने करणार तपास

by प्रतिनिधी
0 comments
CID will investigate Ajit Pawar's accident from three angles

पुणे : प्रतिनिधी : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल घातपाताचा संशय व्यक्त करताना डीजीसीएसह विमान कंपनीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढल्यानंतर आज सीआयडीने तातडीने पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास तीन अँगलने केला जात आहे, अशी माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार अपघात मृत्यूप्रकरणी पोलिसांनी डीजीसीएविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईत मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशन आणि आज बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. पण दोन्ही ठिकाणी पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतला नाही. त्यानंतर ते सीआयडी ऑफिसमध्ये जाणार होते. तत्पूर्वी सीआयडीने घाईघाईने पत्रकार परिषद घेतली.  (CID will investigate Ajit Pawar’s accident from three angles)

पत्रकार परिषदेत सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी या अपघाताचा तपास तीन अँगलने केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कट किंवा घातपात आहे का?, गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आहे का?, गुन्हेगारी कृत्य आहे का? या तीन अँगलने तपास करणणर आहे. या तिन्हीपैकी एक गोष्ट निदर्शनास आली तर सीआयडी गुन्हा दाखल करुन उर्वरित तपास करणार असून न्यायालयात खटला चालणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले. (CID will investigate Ajit Pawar’s accident from three angles)

अजित पवार विमान अपघाताचा सीआयडी योग्य दिशेने तपास करत आहे. केंद्रीय यंत्रणाकडूनही अहवाल मागवले जात आहेत. तपास समाधानकारक आणि योग्य त्या वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एएआयबीचा तपास अहवाल सीआयडीच्या अहवालातही जोडला जाणार असल्याच् रामानंद यांनी सांगितले. (CID will investigate Ajit Pawar’s accident from three angles)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00