महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मूळ भारतीय चंद्रिका टंडन यांना त्यांच्या ‘त्रिवेणी’ अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. त्यांचे सहकारी वूटर केलरमन आणि एरु मात्सुमोटो यांना हा सर्वोत्कृष्ट न्यू एज, ॲम्बियंट म्हणजेच चांट अल्बमसाठी संयुक्त पुरस्कार मिळाला. (Chandrika Tandon )
रविवारी, २ फेब्रुवारी रोजी लॉस एंजेलिस येथील एरिना येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात चंद्रिका यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चंद्रिका या इंद्रा नुई यांच्या बहीण आहे. सिल्क सलवार सूट आणि नेकलेस अशा पोशाखात त्यांनी या सोहळ्यास हजेरी लावली. विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळालेल्या भारतीय वंशाच्या काही प्रतिभावंतांपैकी त्या एक होत.(Chandrika Tandon )
याच श्रेणीमध्ये राधिका वेकारिया, रिकी केज आणि अनुष्का शंकर यांसारख्या नामवंत कलाकारांच्या कलाकृतीचा समावेश आहे. या तिघांना त्यांच्या श्रेणीत स्पर्धेचा जोरदार सामना करावा लागला.
टंडन यांना यापूर्वी समकालीन जागतिक संगीत श्रेणीतील ‘सोल कॉल’ साठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
अल्बमची वैशिष्ट्ये सांगताना टंडन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘या अल्बममधील मंत्र संरक्षणाची कंपणे आणि आंतरिक उपचारांचे प्रतिनिधित्व करतात. आम्हाला आशा आहे की हे संगीत प्रत्येकाला त्यांच्या विपुलतेच्या आंतरिक खोलीपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.’
‘त्रिवेणी’ वर ग्रॅमी नामांकन मिळवताना टंडन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये, ‘अनेकांच्या अतुलनीय पाठिंब्याशिवाय आम्ही येथंपर्यंत पोहोचू शकलो नसतो! माझ्या या प्रवासात अनेक दिग्गज सहकारी संगीतकारांचा अनमोल वाटा आहे. -आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या कलात्मकतेने माझ्यासाठी आणि जगासाठी किती आनंद निर्माण केला आहे.’(Chandrika Tandon )
Congrats @wouterkellerman Eru Matsumoto and Chandrika Tandon – Grammy win for “Triveni”: Best New Age, Ambient or Chant Album #Grammys #GRAMMYS2025 pic.twitter.com/9su1DJLrbO
— Jennifer Su (Jen Su) (@jennifer_su) February 2, 2025
हेही वाचा :
राज्य सरकारतर्फे मराठी चित्रपट महोत्सव
पोलिसाला भोवला ‘पुष्पा’तील ‘शेखावत’!