पुणे : इंद्रायणी नदीवरील अरूंद पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक बुडाल्याची भीती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १० ते १५ जण वाहून गेले आहेत. आपत्कालीन मदत म्हणून बचाव बोटी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. (Bridge collapsed)
पिंपरी-चिंचवड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनहोटे यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) घटनास्थळी पोहोचले आहे. बचाव कार्य सुरू केले आहे. त्यांनी आतापर्यंत ३८ लोकांना वाचवले आहे.
“ सुटी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. पर्यटक पुलावर असतानाच पूल कोसळला. एनडीआरएफ घटनास्थळी आहे,” असे बनहोटे यांनी सांगितले. (Bridge collapsed)
अत्यंत अरुंद पूल
हा पूल अत्यंत अरूंद आहे. एका वेळी फक्त एकच दुचाकी पुलावरून जाऊ शकते. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार होते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाढले की या पुलावरून जाणे अत्यंत धोकादायक ठरायचे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला तरी अन्य पर्याय नसल्याने त्यांना धोका पत्करावा लागत होता. (Bridge collapsed)
रात्री उशीरापर्यंत दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटनेच्या कारणांची चौकशी
पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.(Bridge collapsed)
दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तत्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.
खा. सुळे यांनी दिला धीर
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार दिला. “या ठिकाणी किती पर्यटक होते, कोणते लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधा, त्यांना तातडीने मदत पोहोचवा,” असे निर्देश सुळे यांनी प्रशासनाला दिले.
पोलिस डायरी
हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यांपैकी राजा रघुवंशी याची हत्या म्हणजे एक सुनियोजित षड्यंत्र आणि सुपारी देऊन केलेले हत्याकांड असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव दिले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचे धागेदोरे उलगडले आहेत. (Operation Honeymoon)
- डॉ. विजय चोरमारे
इंदूरहून शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यांपैकी राजा रघुवंशी याची हत्या आणि त्याची पत्नी सोनम बेपत्ता झाल्याच्या बातमीने देशभर खळबळ उडाली होती. २१ मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे केवळ ईशान्य भारतच नव्हे, तर संपूर्ण देश हादरून गेला होता. देशभरातील प्रसारमाध्यमांतून त्याची चर्चा सुरू झाली होती.
देशभर खळबळ उडाली असताना सोनम रघुवंशी नऊ जून रोजी अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये ‘प्रकट’ झाली. त्यावरून एकूण या प्रकरणाबाबतचा गोंधळ वाढवला. राजाची हत्या सोनमने घडवून आणल्याचा दावा मेघालय पोलिस करीत असताना, आपले अपहरण केल्याचा दावा सोनमने केला होता. त्यामुळे एकूण या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती. सोनम आणि राजा रघुवंशीच्या नातलगांनी केलेल्या वक्तव्यांनी गोंधळात भर टाकली होती. परंतु मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले आहेत. (Operation Honeymoon)
पोलिसांनी ऑपरेशन हनिमून असे नाव दिलेले हे नेमके प्रकरण काय आहे आणि त्याचे धागेदोरे कसे उलगडत गेले, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सोनम आणि राजा रघुवंशी या दोघांच्याही कुटुंबांनी दिलेल्या म्हटले आहे की, राजा आणि सोनमच्या लग्नापूर्वी त्यांची भेट आणि बोलणे झाले होते. दोघेही लग्नासाठी तयार होते, आनंदी होते. (Operation Honeymoon)
त्याचमुळे सोनमच राजाच्या हत्येत सामील कशी असेल, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता. सोनम राजाशी लग्नासाठी तयार होती आणि आनंदी होती, तर फक्त १५ दिवसांत तिने राजाची हत्या का घडवून आणली? इंदौरहून शिलाँगला जाऊन हत्या घडवणे, संपूर्ण योजना बनवणे, हे सर्व इतक्या लवकर आणि इतक्या सहजतेने शक्य होते का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पोलिसांनी त्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत.
सोनमचे वडील देवीसिंह कुशवाह यांची इंदूरमध्ये प्लायवूड फॅक्टरी आहे. तिथे काम करणाऱ्या राज कुशवाह या तरुणाशी सोनमचे प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबत राहण्यासाठीच सोनमने पती राजा कुशवाहची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या हत्याकांडाचे सगळे नियोजन एकट्या सोनमनेच केले असून अनेक धक्कादायक बाबी पोलिस तपासातून समोर आल्या आहेत.
आपल्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांना प्रेमविवाह मान्य होणार नाही. त्यामुळे मी त्यांच्या इच्छेनुसार राजा रघुवंशीशी लग्न करते. दरम्यान पतीला संपवते. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करते, असे सोनमने राज कुशवाहला सांगितले होते. त्याचसाठी पुढची सगळी पटकथा रचली आणि त्यानुसार राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली.
हनिमूनला जाण्यासाठी पती राजा रघुवंशीचे आणि आपले विमानाचे तिकिट सोनमनेच बुक केले होते. त्याचवेळी तिने चार संशयितांची रेल्वेची तिकिटे बुक केली होती. आपला प्रियकर राज कुशवाह याच्यासह आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल चौहान असे हे चौघेजण होते. प्रत्यक्षात चौघे रेल्वे स्टेशनवर आले तेव्हा राज कुशवाहने येण्यास नकार दिला आणि तो ट्रेनमध्ये बसला नाही. उरलेले तिघेजण नियोजनानुसार ट्रेनने पोहोचले. त्यांच्या निवासाची व्यवस्था सोनमनेच केली होती.
ही घटना म्हणजे एक सुनियोजित षड्यंत्र आणि सुपारी देऊन केलेले हत्याकांड असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव दिले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचे धागेदोरे उलगडले आहेत. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी या हत्येची पटकथा लिहिली गेली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्या झालेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हीच या हत्येची मूळ सूत्रधार आहे, असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्येतील तिच्या सहभागाचे अनेक भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. (Operation Honeymoon)
गाझीपूरच्या धाब्यावर प्रगटल्यानंतर सोनमने सांगितले की, तिला बंदिवासात ठेवले गेले होते. “लुटमार करून माझे अपहरण करण्यात आले. एका खोलीत मला बंद ठेवले गेले. गाडीत बसवून गाझीपूरच्या ढाब्यावर सोडले.”
परंतु तिची ही कहाणी काल्पनिक आणि दिशाभूल करणारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनिमून’ असे नाव दिले, कारण ही हत्या हनिमून ट्रिपदरम्यान घडली. या ट्रिपचे नियोजन स्वतः सोनमने केले होते. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची देशभरातील माध्यमांतून चर्चा झाली. मेघालयातील पर्यटनावरही त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक पोलिसानी अत्यंत गांभीर्याने तपास केला. पोलिसांच्या मुख्य पथकात २० तज्ज्ञ अधिकारी आणि एकूण १२० पोलीस कर्मचारी सामील होते. सात जून रोजी सर्व संशयित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे मिळाले.
हत्याकांडातील तीन संशयितांशी सोनमची आधीपासूनच ओळख होती. घटनेपूर्वी दहा किलोमीटर अंतरावर त्या तिघांसोबत ती दिसली होती. राजा रघुवंशी आणि सोनम ज्या हॉटेलात थांबले होते, तिथून जवळच्या हॉटेलमध्ये संशयित थांबले होते. पोलिसांच्या हाती सुमारे ४२ सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. स्कुटीच्या मागावरूनही बरीच माहिती मिळाली. आरोपींच्या म्हणण्यानुसार, सोनमने त्यांना राजा रघुवंशीला ठार करण्यास सांगितले.
सोनमने दरम्यानच्या काळात केलेल्या प्रवासावरून तिच्या हत्येतील सहभागाबाबत
- २१ मे : सर्व आरोपी गुवाहाटीला पोहोचले.
- २२ मे : आरोपी शिलाँगला पोहोचले.
- २३ मे : राजा रघुवंशीची हत्या
- सोनम २३ मे रोजी गुवाहाटीहून इंदूरला निघाली.
- २५ मे रोजी ती इंदूरला पोहोचली आणि तिथे ती राजाला भेटली. राजाने तिला एक दिवस इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत थांबवले. (Operation Honeymoon)
- पोलिसांना ३ आणि ४ जूनलाच अंदाज आला होता की, सोनम या हत्येत सामील आहे. आकाशचा रक्ताने माखलेला शर्ट घटनास्थळी सापडला. सोनमने आकाशला दिलेला रेनकोट घटनास्थळापासून ६ किलोमीटर अंतरावर सापडला. हे तपास भटकवण्यासाठी केले गेले होते.
- आनंद कुर्मीला जेव्हा पकडले गेले, तेव्हा घटनेच्या वेळी त्याने घातले होते, तेच कपडे त्याच्या अंगावर होते. हत्येनंतर सर्व आरोपी ११ किलोमीटर अंतरावर एकत्र जमले.
- घटनास्थळावरून आकाशचा रक्ताने माखलेली शर्ट जप्त करण्यात आला.
- सोनमने दिलेला रेनकोट ६ किमी दूर सापडला.
- आनंद कुर्मी तेच कपडे घालून पकडला गेला, जे हत्येच्या वेळी त्याने परिधान केले होते.
- हत्येनंतर सर्व आरोपी ११ किमी दूर एका ठिकाणी जमले.
यावरून पोलिसांना हत्येचे धागेदोरे उलगडण्यात यश आले.
हत्येत वापरलेले हत्यार गुवाहाटीतील एका हॉटेलबाहेरील दुकानातून खरेदी केले गेले.
सोनम आणि राजा रघुवंशीच्या हनीमून ट्रिपदरम्यान एकही फोटो काढला गेला नाही. सोशल मीडियावरसुद्धा कोणतीही माहिती दिली गेली. यामुळेच पोलिसांना संशय निर्माण झाला. मात्र हत्येनंतर अवघ्या १५ मिनिटांनंतर राजा रघुवंशीच्या अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली: “सात जन्मांची साथ आहे.” ही पोस्ट सोनमने स्वतः केली होती, ज्यामुळे ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली.
एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध, दुसरीकडे इस्राएल-पॅलेस्टिनी संघर्षाने जग अस्वस्थ असताना इस्राएलने इराणवर केलेल्या हल्ल्याने जगापुढे आणखी एक गंभीर संकट निर्माण झाले. (Israel-Iran conflict)
-डॉ. विजय चोरमारे
१३ जून २०२५ च्या पहाटे इस्राएलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’अंतर्गत इराणच्या अण्वस्त्र सुविधा, लष्करी तळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात इराणच्या नातांझ येथील प्रमुख युरेनियम संवर्धन केंद्र, खोंदाब आणि खोरमाबाद येथील अण्वस्त्र सुविधा तसेच मिसाईल उत्पादन केंद्रांचे नुकसान झाले. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डचे कमांडर हुसेन सलामी आणि लष्करप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरी यांच्यासह सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. हा हल्ला इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला खीळ घालण्यासाठी आणि इस्राएलच्या अस्तित्वाला असलेला धोका कमी करण्यासाठी होता, असे इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले. (Israel-Iran conflict)
जागतिक परिणाम
हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमती ८-१२% वाढून ७८ यूएस डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील संभाव्य अडथळ्यांमुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे, कारण जगातील २०% तेल या मार्गातून जाते.
इराणच्या राष्ट्रीय तेल कंपनीने सांगितले की, त्यांचे तेल साठवण आणि शुद्धीकरण केंद्र सुरक्षित आहेत, परंतु बाजारातील घबराटीमुळे किमतींवर दबाव आहे. (Israel-Iran conflict)
जागतिक बाजारपेठेत अस्थिरता :
हल्ल्यामुळे जागतिक शेअर बाजारात चढ-उतार दिसले, अमेरिकी स्टॉक फ्यूचर्स घसरले आणि गुंतवणूकदारांनी सोने आणि अमेरिकी ट्रेझरीसारख्या सुरक्षित मालमत्तांकडे धाव घेतली.
स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि रेड सी यांसारख्या व्यापारी मार्गांवर अडथळे येण्याची शक्यता वाढली, ज्यामुळे मालवाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो.
भू-राजकीय तणाव :
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खोमेनी यांनी इस्राएलला या साहसाबद्दल “कठोर शिक्षा” देण्याची धमकी दिली. तर इस्राएलने पुढील हल्ल्यांची तयारी दर्शवली. यामुळे मध्य पूर्वेत व्यापक युद्धाची भीती वाढली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सर्वसंबंधितांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर ओमान आणि तुर्की यांनी इस्राएलच्या हल्ल्याचा निषेध केला. इस्राएलचा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. (Israel-Iran conflict)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचे समर्थन केले असून इराणला अण्वस्त्र करारासाठी अनेकदा संधी दिली, कठोर शब्दात समजावले परंतु त्यांनी ऐकले नाही. मी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, अमेरिकेकडे जगातले सर्वात ताकदवान सैन्य आहे आणि इस्राएलकडे मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे आहेत. आणि त्याचा वापर कसा करायचा हे त्याना ठाऊक आहे. इराण अजूनही करारासाठी तयार झाला नाही, तर पुढचे हल्ले अधिक भीषण असतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
अण्वस्त्र प्रसाराची चिंता :
हल्ल्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला मोठा धक्का बसला, परंतु यामुळे इराणच्या अण्वस्त्र महत्वाकांक्षा वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) इराणला अणुकराराच्या उल्लंघनासाठी दोषी ठरवले आहे, ज्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून नवीन निर्बंध येऊ शकतात.
भारतावरील परिणाम
तेल आयात आणि ऊर्जा सुरक्षा :
भारत आपल्या ८०% तेल गरजा आयातीतून पूर्ण करतो. इराण हा पूर्वीचा तेल पुरवठादार असला, तरी सध्या भारत सौदी अरेबिया आणि इराकवर अवलंबून आहे. तेलाच्या किमतींमधील वाढीमुळे भारताच्या व्यापारी तुटीवर दबाव येईल, ज्यामुळे इंधन, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढेल.
स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील अडथळ्यांमुळे भारताच्या तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो, कारण हा मार्ग भारताच्या तेल आयातीचा प्रमुख मार्ग आहे. (Israel-Iran conflict)
शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था :
हल्ल्यामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता वाढेल. तेलावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांमधील कंपन्या (उदा., ऑटोमोबाईल, पेंट्स) आणि इस्राएलशी संबंधित कंपन्यांवर (उदा., अदानी पोर्ट्स) परिणाम होऊ शकतो.
परदेशी गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाजारावर दबाव वाढेल.
व्यापार आणि निर्यात :
इराण हा भारताच्या बासमती तांदूळ आणि चहाचा प्रमुख खरेदीदार आहे. हल्ल्यामुळे या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो, विशेषतः जर इराणने आर्थिक निर्बंध लादले किंवा प्रतिहल्ले केले तर.
रेड सी आणि सुएझ कालव्यासारख्या मार्गांवरील अडथळ्यांमुळे भारत-युरोप व्यापारावर परिणाम होईल, ज्यामुळे मालवाहतूक खर्च वाढेल आणि विलंब वाढेल.
परदेशी भारतीय कामगार :
आखाती देशांमध्ये सुमारे ९० लाख भारतीय काम करतात. या क्षेत्रातील अस्थिरतेमुळे त्यांच्या नोकऱ्या आणि उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे भारताला मिळणाऱ्या परदेशी चलनावर परिणाम होईल.
कूटनीतिक आव्हाने :
भारताने इस्राएल आणि इराण दोघांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि इराणमधील भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला.
भारताने मध्यस्थीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तणाव वाढल्यास भारताची तटस्थ भूमिका कायम ठेवणे कठीण होईल.
निष्कर्ष
१३ जून २०२५ रोजी इस्राएलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजार, व्यापार आणि भू-राजकीय स्थिरतेवर गंभीर परिणाम झाले. भारतासाठी, तेलाच्या किमतींमधील वाढ, शेअर बाजारातील अस्थिरता आणि निर्यातीवरील परिणाम यामुळे आर्थिक आव्हाने वाढतील. भारताने कूटनीतिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दीर्घकालीन तणावामुळे त्याच्या ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो.
Car driver theft : कर्ज फेडण्यासाठी कारचालकाने केली उद्योजकाच्या घरी चोरी
कोल्हापूर : प्रतिनिधी : उद्योजकाच्या चालकानेच जबरी चोरी केल्याचा गुन्हा कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासात उघड केला. पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यातील मुख्य आरोपी हा उद्योजकाच्या कारवरील चालक आहे. काल गुरूवारी (दि.१२) सम्राटनगर येथील राजीव पाटील यांच्या घरी दोघांनी घरातील वृद्धाला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली होती. कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. पोलिसांनी दोघां संशयितांना ताब्यात घेऊन ४४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख ७५ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली वेरणा कार, दुचाकी असा ५० लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. (Car driver theft)
लक्ष्मी लाडा पंप कंपनीचे मालक राजीव जयकुमार पाटील (वय ६० रा. गोविंद सावंत हौसिंग सोसायटी सम्राटनगर) यांच्या घरी चोरी झाली होती. पाटील यांच्या घरातील सर्व सदस्य दिवसभर घर बंद ठेऊन व्यवसायाच्या ठिकाणी जातात. घरी फक्त राजीव पाटील यांचे वयस्कर सासरे असतात. गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे घरी घुसले. त्यांनी घराबाहेर ठेवलेल्या चावीने घराचा मुख्य दरवाजा उघडून प्रवेश केला. तसेच घरातील वृद्ध व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि गोदरेज कंपनीचे कॉम्पेक्ट साईजचे दोन लॉकर चोरुन नेले होते. उद्योजक राजीव पाटील यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Car driver theft)
एलसीबीने सुरू केला तपास
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही समांतर तपास सुरू केला. घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही चोरी माहितगार व्यक्तीनेच केली असावी असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलिस उप निरीक्षक शेष मोरे यांचे पथक तयार केले. गुन्हाचा तपास करताना माहितारानेच जबरी चोरी केली असावी या अँगलने तपास सुरू केला. दरम्यान पोलिस अंमलदार सुरेश पाटील यांना या गुन्ह्यातील संशयिताची नावे मिळाली. पोलिसांनी कोल्हापूर ते बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी येथे सापळा लावून प्रकाश दत्तात्रय चौगुले (वय ३८ रा. हंचनाळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) आणि अमित विश्वनाथ शिदे (वय २५, रा. यादवनगर) यांची वेरणा कार थांबवली. कारची तपासणी केली असता डिकीमध्ये तीन लहान लॉकर, दोन बॅगा, चाकू, दोन हेल्मेट, दोन रेनकोट मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दोघांनी चोरीची कबुली दिली.
कशी केली चोरी
उद्योजक राजीव पाटल यांच्या कारवर प्रकाश चौगुले हा चालक आहे. तो नेहमी घरी येजा करत असल्याने घराची सर्व माहिती होती. गुरुवारी दुपारी प्रकाश चौगुले आणि त्याचा साथीदार अमित शिंदे दुपारी सम्राटनगर येथील राजीव पाटील यांच्या घराजवळ आले. पाटील यांच्या घराच्या मागे खिडकी उघडून पाटील ज्या ठिकाणी कुलुपाची चावी ठेवतात ती घेऊन दोघांनी घरात प्रवेश केला. दोघांनी रेनकोट आणि हेल्मेट घातले होते. राजीव पाटील यांच्या वयस्कर सासऱ्यांना चाकूचा दाखवून गप्प बसवले. त्यानंतर वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन लॉकरच्या चाव्या जिथे ठेवतात त्या घेऊन त्यांनी चोरी केली. प्रवासी बॅगेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि तीन चॉकर चोरले. आणि तिथून पोबारा केला. पोलिसांनी आज दोघां संशयितांना ताब्यात घेऊन ४४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख ७५ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली वेरणा कार, दुचाकी असा ५० लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. (Car driver theft)
कर्जाची परतफेड करण्यासाठी चोरी
चालक प्रकाश चौगुले याने अनेकजणांकडून कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी त्याला पैसे देणाऱ्यांनी तगादा लावला होता. राजीव पाटील यांच्या घरी नियमित तो जात असल्याने त्याला घराची खडानखडा माहिती होती. चोरी करण्यासाठी त्याने अमित शिंदेचे मन वळवले होते. चोरीतील काही दागिने देण्याची आमिष अमित शिंदेला प्रकाश चौगुलेने दाखवले होते.
यांनी केला यशस्वी तपास
पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार सुरेश पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, रमेश माने, विशाल खराडे, विनोद कांबळे, संतोष बरगे, अरविंद पाटील, रामचंद्र कोळी, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अमित सर्जे, सचिन बेडखेळे यांनी यशस्वी तपास केला.
नवी दिल्ली : हवाई दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेक नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे, वायएसआर, संजय गांधी यांच्यासह सीडीएस जनरल बीपीन रावत यांनी अशा दुर्घटनांमध्ये प्राण गमावले आहेत. गुरुवार (१२ जून)च्या विमान दुर्घटनेत गुजरात माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह २४१ जणांचा मृत्यू झाला. (Aircrash)
या पार्श्वभूमीवर पीटीआयने अशा दुर्घटनांची आणि यात मृत्युमुखी पडलेल्या प्रमुख व्यक्तींची यादी दिली आहे.
* होमी भाभा (१९६६)
भारताच्या अणुकार्यक्रमाचे प्रणेते अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी एअर इंडिया फ्लाइट १०१ मध्ये एका अपघातात दुःखद निधन झाले. जिनेव्हा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी झालेल्या चुकीच्या संपर्कामुळे विमान स्विस आल्प्समधील माँट ब्लँक येथे कोसळले. (Aircrash)
* संजय गांधी (१९८०)
काँग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे २३ जून १९८० रोजी अपघातात निधन झाले. सफदरजंग विमानतळाजवळ दिल्ली फ्लाइंग क्लबच्या विमानात हवाई स्टंट करण्याचा प्रयत्न करताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले.
* माधवराव सिंधिया (२००१)
ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव सिंधिया, जे स्वतः माजी नागरी विमान वाहतूक मंत्री होते यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी कानपूर येथे एका राजकीय रॅलीदरम्यान विमान अपघातात निधन झाले. त्यांना घेऊन जाणारे १० आसनी खाजगी विमान उत्तर प्रदेशातील मणिपुरीजवळ खराब हवामानामुळे कोसळले. (Aircrash)
* जीएमसी बालयोगी (२००२)
लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते जीएमसी बालयोगी यांचा ३ मार्च २००२ रोजी अशाच अपघातात मृत्यू झाला. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथून त्यांना घेऊन जाणारे खाजगी हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूरजवळील तलावात कोसळले.
* सायप्रियन संगमा (२००४)
मेघालयाचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन संगमा आणि इतर नऊ जणांचा राज्याच्या राजधानीपासून फक्त २० किमी अंतरावर असलेल्या बारापाणी तलावाजवळ हेलिकॉप्टर कोसळून मृत्यु झाला. २२ सप्टेंबर २००४ रोजी ही दुर्घटना घडली.
* के. एस. सौम्या (२००४)
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री के. एस. सौम्या १७ एप्रिल २००४ रोजी एका विमान अपघातात मृत्युमुखी पडली. ‘सूर्यवंशम’ मधील तिची भूमिका अत्यंत गाजली होती. सौम्या तिच्या भावासोबत बेंगळुरूहून करीमनगरला विमानाने जात होती. त्यावेळी हा अपघात झाला.
* ओ. पी. जिंदाल आणि सुरेंदर सिंग (२००५)
उद्योगपती आणि हरियाणाचे मंत्री ओम प्रकाश (ओपी) जिंदाल २००५ मध्ये कृषी मंत्री सुरेंदर सिंग यांच्यासह एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांचे हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये कोसळले. (Aircrash)
* वाय. एस. रेड्डी (२००९)
आंध्र प्रदेशचे तत्कालीन लोकप्रितय मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी (२००९) यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले. त्यांचे बेल ४३० हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे घनदाट अशा नल्लामला जंगलात कोसळले. ते वायएसआर म्हणून प्रसिद्ध होते.
* दोरजी खांडू (२०११)
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू आणि इतर चार जणांचा ३० एप्रिल २०११ रोजी पश्चिम कामेंग जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला. तवांगहून इटानगरला घेऊन जाणाऱ्या त्यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. * सीडीएस जनरल बिपिन रावत (२०२१) भारताचे पहिले संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. ही घटना तामिळनाडूतील कुन्नूरजवळ घडली. जनरल रावत त्यांच्या पत्नी आणि इतर ११ जणांसह सुलूरहून वेलिंग्टनला जात होते.
हेही वाचा :
इराणवरील हल्ल्यानंतर एअर इंडियाकडून १६ विमाने रद्द
मी जिवंत कसा बाहेर पडलो ?
Flight cancelled: इराणवरील हल्ल्यानंतर एअर इंडियाकडून १६ विमाने रद्द
नवी दिल्ली : इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले केल्यानंतर त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (१३ जून) एअर इंडियाने १६ विमाने रद्द केली, त्यातील काहींचे मार्ग वळवण्यात आले आहेत. (Flight cancelled)
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे, ‘‘या अनपेक्षित व्यत्ययामुळे आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते. प्रवाशांना राहण्याची सोय करण्यासह त्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. विमानाचे बुकिंग रद्द केल्यास संबंधित प्रवाशांचे पैसे परत दिले जातील. वेळापत्रकात बदल केल्यास चार्ज आकारण्यात येणार नाही. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.’’ (Flight cancelled)
गुरुवारी (१३ जून) दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच लंडनला जाणारे एअर इंडियाचे एक विमान कोसळले. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळले.
भारताने व्यक्त केली चिंता
इस्रायलने इराणमधील अणुऊर्जा संशोधन केंद्रांसह अनेक लक्ष्यांवर हल्ले केल्याचा दावा केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. तेहरान आणि तेल अवीवमधील भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांना या प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (१३ जून) तसे निवेदन जारी केले आहे. (Flight cancelled)
‘‘नुकत्याच इराण आणि इस्रायलदरम्यान घडलेल्या घडामोडींबद्दल आम्हाला खूप चिंता आहे. आम्ही अणुकेंद्रांवरील हल्ल्यांशी संबंधित माहिती घेत आहोत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांनी कोणतेही तणावपूर्ण आणि टोकाची पावले उचलू नयेत, असे आवाहन केले आहे,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
यापूर्वी इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याचे आवाहन केले होते. भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांना मिशनच्या सोशल मीडिया अकाउंटचे अनुसरण करण्याचे आवाहन केले होते. इस्रायलमधील भारतीय दूतावासानेही असाच सल्ला जारी केला होता. यामध्ये भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचे, देशात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित आश्रयस्थानांच्या जवळ राहण्याचे आवाहन केले होते. ‘‘भारत दोन्ही बाजूंना कोणतेही तणावपूर्ण पाऊल न उचलण्याचे आवाहन करतो. तणावाची परिस्थिती कमी करण्यासाठी आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेच्या विद्यमान माध्यमांचा वापर केला पाहिजे. भारताचे दोन्ही देशांशी जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि आमच्या बाजूने आम्ही शक्य ते सर्व करण्यास तयार आहोत, ’’ असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात स्पष्ट केले आहे.
#TravelAdvisory
— Air India (@airindia) June 13, 2025
Due to the emerging situation in Iran, the subsequent closure of its airspace and in view of the safety of our passengers, the following Air India flights are either being diverted or returning to their origin:
AI130 – London Heathrow-Mumbai – Diverted to Vienna…
हेही वाचा :
इस्त्रायलचे इराणच्या अणुभट्टी, लष्करी स्थळावर हल्ले
मी जिवंत कसा बाहेर पडलो ?
British Passengers in AI 171: अपघातग्रस्त विमानात ५६ ब्रिटीश नागरिक
नवी दिल्ली : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. यात १६९ भारतीय आणि ५६ ब्रिटीश नागरिकांचा समावेश आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा समावेश होता. एअर इंडियाने ही माहिती जाहीर केली आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर ही पोस्ट करण्यात आली आहे. (British Passengers in AI 171)
गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान AI १७१ हे उड्डाण उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते, असे एअरलाइनने या पोस्टमध्ये जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
बिझनेस क्लासमध्ये चेक इन केलेल्या प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा समावेश होता.
एअर इंडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक या विमानातून प्रवास करत होते. (British Passengers in AI 171)
विमानाने दुपारी १.३८ वाजता उड्डाण केले, परंतु त्यानंतर काही वेळातच त्यात मोठा बिघाड झाला आणि ही भीषण घटना घडली.
अपघातस्थळी शोध आणि बचावकार्य सुरू असल्याने अधिकाऱ्यांनी प्रवाशांची संपूर्ण यादी उपलब्ध करून दिली आहे.
एनडीआरएफ, बीएसएफ पथके बचाव कार्यासाठी दाखल
दरम्यान, अपघातस्थळी बचाव आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) सहा आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
एनडीआरएफच्या एका अधिकाऱ्यानुसार, अहमदाबाद विमानतळाजवळील दोन टीम आधीच अपघातस्थळी पोहोचल्या आहेत, तर आणखी चार पथके मार्गस्थ आहेत.
याव्यतिरिक्त, आपत्कालीन प्रतिसादात मदत करण्यासाठी दलाच्या सीमावर्ती मुख्यालयातील दोन बीएसएफ पथके रवाना करण्यात आली आहेत. (British Passengers in AI 171)
विमानतळावर दहशतवादविरोधी सुरक्षा सांभाळणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी, स्थानिक अग्निशमन दल आणि पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचलेल्या पहिल्या प्रतिसादकर्त्यांमध्ये होते.
एअर इंडियाचे चेअरमन यांनी व्यक्त केल्या संवेदना
या भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाचे चेअरमन यांनी टाटा समूहाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चंद्रशेखरन यांनी अपघातात सापडलेल्यांया कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये एन.चंद्रशेखरन म्हणाले की, “या हादरवून टाकणार्या घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांचे कुटुंबीय आणि आणि प्रियजनांप्रित आम्ही संवेदना आणि शोक व्यक्त करतो.” “या क्षणी आमचे प्राधान्य हे अपघातग्रस्तांना लवकरात लवकर मदत पुरवणे हे आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या एमर्जन्सी रिस्पॉन्स पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना आवश्यक ती मदत देण्यासाठी आणि जखमींची काळजी घेण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहोत,” असेही चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
With profound sorrow I confirm that Air India Flight 171 operating Ahmedabad London Gatwick was involved in a tragic accident today. Our thoughts and deepest condolences are with the families and loved ones of all those affected by this devastating event.
— Tata Group (@TataCompanies) June 12, 2025
At this moment, our…
Air India confirms that flight AI171, from Ahmedabad to London Gatwick, was involved in an accident today after take-off.
— Air India (@airindia) June 12, 2025
The flight, which departed from Ahmedabad at 1338 hrs, was carrying 242 passengers and crew members on board the Boeing 787-8 aircraft. Of these, 169 are…
Plane crash in Ahmadabad : कोसळत्या विमानाच्या प्रचंड आवाजाने घबराट
अहमदाबाद : लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग विमान गुरुवारी (११ जून) दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोसळले. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ते जवळच्याच मेघनी नगर या निवासी भागात कोसळले. हे विमान एका इमारतीवर कोसळले. ते कोसळताना स्फोटासारखे एका पाठोपाठ एक प्रचंड आवाज झाले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. २४२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह उड्डाण केलेले हे विमान अपघातग्रस्त झाल्याने अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची भीषणता दाखवणारी छायाचित्रे. (Plane crash in Ahmadabad)


अहमदाबाद : आगीत विमान बेचिराख झाले होते. घटनास्थळी विमानाचे जळालेले अवशेष उरले होते. (Plane crash in Ahmadabad)


हेही वाचा :
एअर इंडियाचे विमान अहमदाबादेत कोसळले
३०० कोटींचे ४७९ किलो कोकेन जप्त
AIR INDIA Plane Crash: एअर इंडियाचे विमान अहमदाबादेत कोसळले; २०४ मृतदेह बाहेर काढले
नवी दिल्ली : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळले; विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (AIR INDIA Plane Crash)
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) विमान अपघाताची चौकशी करेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
लंडनला जाणारे हे विमान उड्डाणानंतर जवळच्याच मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले.
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील होते, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.
“विजय रूपाणी एअर इंडियाच्या विमानाने लंडनला जात होते,” असे वरिष्ठ भाजप नेते भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी सांगितले.
“मी त्यांची विचारपूस करण्यासाठी शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जात आहे,” असे श्री. चुडासामा यांनी पत्रकारांना सांगितले.
हे विमान लंडनला जात होते. ते शहरातील मेघानी भागात कोसळले. विमान कोसळताना प्रचंड मोठा आवाज झाला आणि काळ्या धुराचे लोट आसमंतात पसरले. घटनास्थळी तातडीने आपत्कालीन मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
‘‘या अपघातात कोणीही वाचलेले दिसत नाही,’’ असे शहराचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी एएफपीला सांगितले. ‘‘विमान निवासी भागात आणि काही कार्यालयांवर पडल्याने मृतांची संख्याही जास्त आहे.’’
प्राथमिक माहितीनुसार, वाइड-बॉडी बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान सुमारे ३०० प्रवासी क्षमतेचे आहे. अपघात झाला तेव्हा त्यात २४२ लोक होते. (AIR INDIA Plane Crash)
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते. त्यामुळे अपघातानंतर झालेल्या स्फोट आणि आगीची तीव्रता वाढली.
बचाव कार्य करण्यासाठी अनेक अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
सध्या जीवितहानीबद्दलचे कसलेही अधिकृत वृत्त नाही.(AIR INDIA Plane Crash)
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) अपघातग्रस्त बोईंगच्या संभाव्य तांत्रिक पथकासह औपचारिक चौकशी सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.
अपघाताच्या संशयास्पद कारणाबद्दल अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. आंतरराष्ट्रीय मार्गावर इंधनाचा जास्त भार असल्याने अपघातानंतर आगीची तीव्रता प्रचंड वाढली असावी. त्यामुळे बचाव कार्य गुंतागुंतीचे झाले असावे, असे तज्ञांचे मत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि अहमदाबाद पोलिस आयुक्तांशी या घटनेबाबत संपर्क साधला आणि चर्चा केली आहे.
अपघातानंतरच्या परिस्थितीचे व्यवस्थापन आणि चौकशीसाठी केंद्र सरकार राज्याला आवश्यक ती सर्व मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
विमान इमारतीवर आदळले
अपघातग्रस्त विमान वसतिगृहाच्या इमारतीवर आदळल्याने ही मोठी दुर्घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या दृश्यांमध्ये विमानाचे अवशेष एका निवासी इमारतीच्या छतावर पडलेले दिसून आले.
Ahmedabad Plane Crash: Video captured exact moment Air India's AI -171 passenger aircraft crashed near Meghnaninagar area earlier today.
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
(Disclaimer: PTI can not verify the authenticity of the video)
(Source: Third party) pic.twitter.com/qAK8aP6wGH
VIDEO | Ahmedabad Plane crash: Injured rushed to the hospital.#planecrash
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third Party) pic.twitter.com/Iqy7PolCWE
नवी दिल्ली : कॅनडियन अधिकाऱ्यांनी पील रीजनल नावाच्या मोठ्या नार्को दहशतवादी नेटवर्कचा पर्दापाश केला. अटक केलेले संशियत खलिस्तान समर्थकांशी संबंधित आहेत. या कारवाईत ४७.९ दशलक्ष डॉलर्स किमतीचे ४७९ किलो कोकेन जप्त करण्यात आले. भारतीय मूल्यात या कोकेनची किंमत अंदाजे ३०० कोटी रुपये आहे. पोलिसांनी कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या सात भारतीय वंशाच्या पुरुषांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. (Project Pelican)
पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की, पील रेजनल नावाच्या नेटवर्कने अमेरिकेपासून कॅनडापर्यंतच्या व्यावसायिक ट्रकिंग मार्गांचा वापर केला आहे. त्यांचे संबंध मेक्सिकन कार्टेल आणि यूएस-आधारित वितरकांशी आहेत.
सूत्रांनी सांगितले की, ड्रग्ज तस्करीतून मिळणारे उत्पन्न भारतविरोधी कारवायांसाठी, ज्यामध्ये निदर्शने आणि जनमत चाचणी यासारख्या भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरले जात होते. तसेच शस्त्रांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात होता. कॅनडामधील खलिस्तानी गटांना उच्च किमतीच्या मेक्सिकन कोकेनची तस्करी करण्यासाठी निधी दिला जात आहे. आयएसआय अफगाणिस्तानात पिकवलेल्या हेरॉइनचा पुरवठा करत असल्याचे देखील आढळून आले आहे. (Project Pelican)
अटक केलेल्यांमध्ये टोरंटो येथील सजगीथ योगेंद्रराजा (३१), ब्रॅम्प्टन येथील मनप्रीत सिंग (४४), हॅमिल्टन येथील फिलिप टेप (३९), ब्रॅम्प्टन येथील अरविंदर पोवार (२९), कॅलेडॉन येथील करमजीत सिंग (३६), कॅलेडॉन येथील गुरतेज सिंग (३६), केंब्रिज येथील सरताज सिंग (२७), जॉर्जटाऊन येथील शिव ओंकार सिंग (३१) आणि मिसिसॉगा येथील हाओ टॉमी हुयन्ह (२७) यांचा समावेश आहे. कॅनेडियन पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर बंदुक आणि अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांशी संबंधित एकूण ३५ आरोप आहेत. (Project Pelican)