Home » Blog » Project Pelican : ३०० कोटींचे ४७९ किलो कोकेन जप्त

Project Pelican : ३०० कोटींचे ४७९ किलो कोकेन जप्त

by प्रतिनिधी
0 comments
Project Pelican

नवी दिल्ली : कॅनडियन अधिकाऱ्यांनी पील रीजनल नावाच्या मोठ्या नार्को दहशतवादी नेटवर्कचा पर्दापाश केला. अटक केलेले संशियत खलिस्तान समर्थकांशी संबंधित आहेत. या कारवाईत ४७.९ दशलक्ष डॉलर्स किमतीचे ४७९ किलो कोकेन जप्त करण्यात आले. भारतीय मूल्यात या कोकेनची किंमत अंदाजे ३०० कोटी रुपये आहे.  पोलिसांनी कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या सात भारतीय वंशाच्या पुरुषांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. (Project Pelican)

पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की, पील रेजनल नावाच्या  नेटवर्कने अमेरिकेपासून कॅनडापर्यंतच्या व्यावसायिक ट्रकिंग मार्गांचा वापर केला आहे. त्यांचे संबंध मेक्सिकन कार्टेल आणि यूएस-आधारित वितरकांशी आहेत.

सूत्रांनी सांगितले की, ड्रग्ज तस्करीतून मिळणारे उत्पन्न भारतविरोधी कारवायांसाठी, ज्यामध्ये निदर्शने आणि जनमत चाचणी यासारख्या भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरले जात होते.  तसेच शस्त्रांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात होता. कॅनडामधील खलिस्तानी गटांना उच्च किमतीच्या मेक्सिकन कोकेनची तस्करी करण्यासाठी निधी दिला जात आहे. आयएसआय अफगाणिस्तानात पिकवलेल्या हेरॉइनचा पुरवठा करत असल्याचे देखील आढळून आले आहे. (Project Pelican)

अटक केलेल्यांमध्ये टोरंटो येथील सजगीथ योगेंद्रराजा (३१), ब्रॅम्प्टन येथील मनप्रीत सिंग (४४), हॅमिल्टन येथील फिलिप टेप (३९), ब्रॅम्प्टन येथील अरविंदर पोवार (२९), कॅलेडॉन येथील करमजीत सिंग (३६), कॅलेडॉन येथील गुरतेज सिंग (३६), केंब्रिज येथील सरताज सिंग (२७), जॉर्जटाऊन येथील शिव ओंकार सिंग (३१) आणि मिसिसॉगा येथील हाओ टॉमी हुयन्ह (२७) यांचा समावेश आहे. कॅनेडियन पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर बंदुक आणि अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांशी संबंधित एकूण ३५ आरोप आहेत. (Project Pelican)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00