बेळगाव : प्रतिनिधी : टिप्पर आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात टिप्पर चालक, त्याची पत्नी आणि बस चालक असे तीन जण जागीच ठार झाले तर बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले. विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी क्रॉस येथे हा भीषण अपघात घडला. (Three killed in accident)
टिप्परचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टिप्पर समोरून येणाऱ्या बसला धडकला. दोन्ही वाहने वेगात असल्याने टिप्पर चालक, त्याची पत्नी आणि बस चालक जागीच ठार झाले. टिप्पर विजयपूरला निघाला होता तर बस चडचणला निघाली होती. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलीसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. दहा गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद चडचण पोलीस स्थानकात झाली आहे. (Three killed in accident)