मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (४ जुलै) पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. (Raut attack Shinde)
अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप बाहेर आले, असे ट्विट करत, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर जहरी टीका केली.
पुण्यात या महाशयांनी अमित शाह यांच्या समोर ‘जय गुजरात’ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या, हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?, असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला आहे. (Raut attack Shinde)
पुण्यातील गुजराती समुदायाकडून जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उदघाटन समारंभावेळी अमित शाह आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’, अशी घोषणा दिली.
हिंदी भाषा सक्ती रद्द करण्यास राज्य सरकारला भाग पाडल्याबद्दल शनिवारी (५ जुलै) मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजयी मेळावा होत आहे. या मेळाव्यातही शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (Raut attack Shinde) तत्पूर्वीच शिंदे यांचे भाषण ट्विट करत खासदार संजय राऊत यांनी, “अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!,’’ अशी टीका शिंदे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र’सह ‘जय गुजरात’ घोषणा!
आमच्या नायकांवर अन्याय झाला : मुख्यमंत्री