Home » Blog » Jai Gujarat slogan: एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र’सह ‘जय गुजरात’ घोषणा!

Jai Gujarat slogan: एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र’सह ‘जय गुजरात’ घोषणा!

by प्रतिनिधी
0 comments
Jai Gujarat slogan

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणाचा समारोप ‘जय महाराष्ट्र’ या घोषणेबरोबरच ‘जय गुजरात’ म्हणूनही केला. शुक्रवारी (४ जुलै) पुणे गुजराती समुदायाच्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उदघाटन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. (Jai Gujarat slogan)

मराठी-हिंदीचा वाद पेटला असतानाच शिंदे यांनी दिलेल्या जय गुजरात घोषणेचे पडसाद शनिवारी (५जुलै) मनसे-शिवसेनेच्या विजयी मेळाव्यात उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक करताना त्यांनी त्यांच्या (अमित शाह) यांच्या घरात मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषा बोलल्या जातात. दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. अमित शाह हे गुजराती असले तरी ते महाराष्ट्राचे जावई आहेत. ते होम मिनिस्टर असले तरी त्यांच्या घरातील होम मिनिस्टर आपल्या कोल्हापूरच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी विकास, उद्योग आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये नेहमीच देशाला दिशा दाखवली आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, राज्याच्या विकासात व्यापारी आणि उद्योजकांचेही महत्त्वाचे योगदान आहे. सरकारकडूनही त्यांना काही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, असे सांगत शिंदे यांनी भाषणाचा समारोप करताना जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा दिली. (Jai Gujarat slogan)

एकनाथ शिंदे यांनी यावेळी २०२२ च्या सत्ताबदलाचा पुनरूच्चार केला. “अमित शाहांच्या रणनीती आणि नेतृत्वामुळे अशक्य ते शक्य करून दाखवले. त्यांनी आव्हानांना संधीत बदलले. त्यांच्या या कार्यक्षमतेचा स्वतः अनुभव घेतला आहे. त्यावेळी राज्यात सामान्य माणसाचे सरकार आणणे गरजेचे होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन होतेच. पण अमित शाह माझ्यामागे पर्वतासारखे ठामपणे उभे होते,” असे ते म्हणाले. (Jai Gujarat slogan)

भाषणाचा समारोप करण्याआधी शिंदे यांनी अमित शाह यांची स्तुती करताना एक शेरही सादर केला.

“आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है,

दुश्मन क्या चीज है, तुफानभी अपना रुख बदल देता है

आपके आनेसे यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स अदब से झुक जाता है”

मराठी आमचा श्वास, हिंदुत्व आत्मा : शिंदे
दरम्यान, शिंदे यांच्या घोषणेवरून वादंग उठल्यानंतर त्यांनी संध्याकाळी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वत:मध्ये डोकावून पहावे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच मराठी आमचा श्वास आहे, आमची अस्मिता आहे आणि हिंदुत्व आत्मा आहे, असे ते म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00