जमीर काझी : मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या फलटणच्या महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा तपास विशेष तपास पथकाकडून ( एसआयटी) करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचे आदेश पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले आहेत. (SIT to investigate Munde’s suicide)
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. मुंडे यांनी एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने व प्रमोद बनकर जबाबदार असल्याचे म्हटले होते. मात्र तिच्या पालकांनी आपल्या मुलीची हत्या झाली असून या प्रकरणाचा तपास न्यायालयांच्या नेतृत्वाखाली करण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांचा सहभाग आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गट व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. (SIT to investigate Munde’s suicide)
या प्रकरणात अनेक नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती. (SIT to investigate Munde’s suicide)