Home » Blog » मुंबई विमानतळावर ३० किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावर ३० किलो सोने जप्त

by प्रतिनिधी
0 comments
30 kg gold seized at Mumbai airport

जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करीत परदेशातुन तस्करी करून आणलेले ३८ कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले. ऑपरेशन धहाबू ब्लिट्झ’ अंतर्गत झालेल्या या कारवाईत तब्बल २९.३७ किलो सोने मिळाले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३७.७३ कोटी आहे. या तस्करीप्रकरणी २५ जणांना अटक करण्यात आली आहे. (30 kg gold seized at Mumbai airport)

केनियाहून मुंबईला येत असलेल्या विमानात २५ प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याची माहिती डीआरआयच्या गुप्त वार्ता विभागाला मिळाली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ टर्मिनलवर साध्या वेषात पाळत ठेवण्यात आली होती. बुधवारी ८ एप्रिलला पहाटेच्या सुमारास केनियाहून आलेले विमान लँड होताच अधिकाऱ्यांनी संशयितांना वेगळे करत त्यांची सामानासह झडती घेण्यास सुरूवात केली. त्यांनी त्याला नकार देत आरडाओरडा केल्याने ‘सीआरएसएफच्या जवानाची मदत घेत त्यांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये प्रवाश्यांकडून २५.१० किलो सोन्याची बिस्किटं आणि ४.२७ किलो सोन्याचे दागिने हस्तगत मिळाले. याप्रकरणी डीआरआयने २५ जणांना अटक केली आहे. (30 kg gold seized at Mumbai airport)

बुटात, अंगावर लपविले होते  सोने

या सर्व प्रवाशांची सामानासह झडती घेतली असता, काहींनी अंगावर तर काहींनी बुटात सोन्याची बिस्कीट लपविले होते. ‘डीआरआय’ची धाड पडताच यातील काहींनी अंगावर लपवलेलं सोनं बॅगेज बेल्टजवळ फेकून दिलं. त्यामुळे अनेक ठिकाणी काळ्या टेपनं गुंडाळून ठेवलेली सोन्याची पाकिटं पडल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं. सर्व सामानाची यादी तयार करण्यात आली असून २५ प्रवाशांकडून २९ किलो ३७३ ग्रॅम सोनं हस्तगत केले  आहे. (30 kg gold seized at Mumbai airport)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00