Home » Blog » गव्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार

गव्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार

by प्रतिनिधी
0 comments
Elderly Man Killed in Gaur Attack

कोल्हापूर : प्रतिनिधी : गव्याच्या हल्ल्यात शामराव कोडिंबा कोराणे (वय ८०, रा.पालखुर्द, ता.राधानगरी) या वृद्धाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी राधानगरी तालुक्यातील पालखुर्द या गावात घटना घडली. (Elderly Man Killed in Gaur Attack)

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शामराव कोराणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुपारी ते घराच्या पाठीमागील झाडाखाली बसले होते. त्याचवेळी जंगलातून गावात आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या छातीत गव्याची शिंगे घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी वाहनाने कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सीपीआर पोलिस चौकात गव्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार अशी नोंद झाली आहे. मयत शामराव कोराणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. (Elderly Man Killed in Gaur Attack)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00