जमीर काझी : मुंबई : भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत महाराष्ट्रातील जमिनी उद्योगपतींना कशा दिल्या गेल्या, त्यातून किती पैसा उभा राहिला, आणखी कोणत्या जमिनी विकायच्या आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेत किती भ्रष्टाचार झाला, याचा हिशोब घेण्यासाठीच अमित शहा महाराष्ट्रात आले आहेत का?, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा ‘सेवा संकल्प अभियान’ नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक खेळण्यासाठी आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केली आहे. (Sapakal criticizes Amit Shah’s announcement)
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी
शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. या आर्थिक राजधानीत येऊन महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त ‘मेवा’ कसा लुटता आणि खाता येईल, याची कारस्थाने रचण्यासाठीच अमित शहा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा असल्याचे दिसत आहे.महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटातून जात आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना खरोखरच महाराष्ट्राची आणि शेतकऱ्यांची सेवा करायची असेल, तर त्यांनी ‘मेवा’ लाटण्याच्या राजकारणात न पडता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी. तरच त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला काही अर्थ आहे. अन्यथा हा दौरा केवळ राजकीय नाटक ठरेल. (Sapakal criticizes Amit Shah’s announcement)
कुंभमेळा भ्रष्टाचाराचा आढावा घेण्यासाठी आलेत
कुंभमेळ्यासाठी झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाचा हिशोबही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे. कुंभमेळ्याच्या नावाखाली झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आढावा घेऊन त्यातील पैशांचे वाटप कसे करायचे, याचाच आढावा या दौऱ्यात घेतला जात आहे का? असा सवाल सपकाळ यांनी केला. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र दौरा करण्याचे कारण पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात हा दौरा भ्रष्टाचाराचा हिशोब करण्यासाठी आणि आगामी काळातील ‘मेवा’चे वाटप निश्चित करण्यासाठी आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
आरएसएसचे ‘लिबरल’ रूप हे डुप्लिकेट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘लिबरल’ रूप हे डुप्लिकेट आहे. संघाने आपले खरे ध्येय-धोरण नेहमीच लपवून ठेवले आहे. ‘बंच ऑफ थॉटस्’ हे संघाच्या विचारसरणीचे महत्त्वाचे पुस्तक मानले जाते; मात्र प्रत्यक्षात आपले हेच तत्त्वज्ञान संघाकडून लपवले जाते. भारताच्या तिरंग्याला विरोध करणारा इतिहास असतानाही आज तिरंगा आमचाच आहे,अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते. त्यामुळे संविधान आणि लोकशाही व्यवस्थेबाबत संघाचे प्रेम हे संशयाच्या घेऱ्यात असल्याचे सपकाळ यांनी म्हटले.संघाची विचारसरणी, संविधानाबाबतची भूमिका आणि मुस्लिम समाजाबद्दलचा दृष्टिकोन यावर संघाने स्पष्ट भूमिका मांडावी. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी याचा थेट खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. (Sapakal criticizes Amit Shah’s announcement)