नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्यातील लष्कर- ए- तैयबाच्या दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटात उद्धवस्त झाली. सुरक्षा दलाचे अधिकारी त्यांच्या घरात शोध घेत असताना घरात आधीच ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. सुरक्षादलाची दलाची एक तुकडी बचावली. (Blast in terrorist’s house)
पहेलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए- तैयबाचे दोन दहशतवादी आदिल हुसेन ठोकर आणि आसिफ शेख यांची घरे गुरुवारी (दि. २४) रात्री स्फोटात उद्धवस्त झाली. अदिल ठोकरचे अनंतनाग येथे तर असिफ शेख अवंतीपोरा येथे घर आहे. दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेख यांच्या घरांमध्ये शोध घेत असतानाच त्यांच्या घरात आधीच ठेवलेल्या स्फोटकांचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांची घरे उद्ध्वस्त झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Blast in terrorist’s house)
२०१८ मध्ये अटारी-वाघा सीमेवरून अदिल ठोकर कायदेशीररित्या पाकिस्तानला गेला होता. ठोकरने गेल्या वर्षी गुप्तपणे जम्मू आणि काश्मीरला परतण्यापूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे. गुप्तचर सूत्रांच्या मते, त्याने अलिकडच्या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी मार्गदर्शक आणि रसद समन्वयक म्हणून काम केले होते. अनंतनाग पोलिसांनी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आदिल हुसेन ठोकर, अली भाई आणि हाशिम मुसा अशी त्यांची नावे आहेत. हे २२ एप्रिल रोजी पहेलगाममधील बैसरन येथे झालेल्या विनाशकारी हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा संशय आहे. (Blast in terrorist’s house)
तत्पूर्वी, सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी खुलासा केला की, पहेलगाम हल्ला घडवून आणणाऱ्या संशयित तिन्ही दहशतवाद्यांनी त्यांची ओळख लपवण्यासाठी मुसा, युनूस आणि आसिफ या विशिष्ट कोड नावांचा वापर केला होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, लष्कराच्या गणवेशात आलेल्या सहा परदेशी दहशतवाद्यांनी धर्म विचारत पर्यटकांवर गोळ्या घातल्या.
हेही वाचा :