Home » Blog » Gautam Gambhir : गौतम गंभीरला ठार मारण्याची धमकी

Gautam Gambhir : गौतम गंभीरला ठार मारण्याची धमकी

आयसीस कश्मिर च्या ईमेलवरुन धमकी

by प्रतिनिधी
0 comments
Goutam Gambhir

नवी दिल्ली :  प्रतिनिधी : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक, माजी खेळाडू भाजपचा माजी खासदार गौतम गंभीर याला ठार मारण्याची धमकी दिली आहे. आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने धमकी दिली आहे. (Gautam Gambhir)

आयसीसी काश्मीर नावाच्या ई मेल अड्रेसवरुन धमकीचा मेल आला आहे. गौतम गंभीरने दिल्लीतील राजेंद्रनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस तपास करत आहेत. यापूर्वीही गंभीरला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पण यावेळी प्रथमच त्याला अतिरेकी संघटनेकडून धमकी मिळाली आहे.

गौतम गंभीरसाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला २२ एप्रिल रोजी दोन ई मेल आहे. दोन्ही ईमेलमधून गंभीरला धमकी देण्यात आली आहे. दोन्ही मेल आयसीस काश्मीर या अकाउंटवरुन आले आहेत. मेल मध्ये ‘आय कील यू’ अशी ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर गंभीरने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गौतम गंभीर सुट्टी घालवण्यासाठी युरोपला गेला होता. भारतात परतण्याच्या आदल्या दिवशी त्याला धमकीचा ई मेल मिळाला आहे.  जम्मू काश्मीर पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दोन घटना संबध आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. झालेल्या घटनेचा गैरफायदा घेऊन गंभीरला धमकी मिळाली आहे याचाही पोलिस तपास करत आहेत. (Gautam Gambhir)

हेही वाचा :

सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00