जयपूर : रणगाड्यात दारूगोळा भरत असताना झालेल्या स्फोटात दोघा सैनिकांचा मृत्यू झाला. बिकानेरच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये बुधवारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक जवान जखमी झाला. प्रशिक्षणावेळी दारूगोळा लोड करत असताना चार्जरचा स्फोट झाला, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल अमिताभ शर्मा यांनी सांगितले. (Bikaner)
स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तीन सैनिक सराव करत होते. त्यावेळी झालेल्या स्फोटात आशुतोष मिश्रा आणि जितेंद्र यांचा मृत्यू झाला. जखमी जवानाला हेलिकॉप्टरमधून चंदीगडला उपचारासाठी नेण्यात आले आहे, असे लुंकरानसार (बिकानेर)चे मंडळ अधिकारी नरेंद्र कुमार पुनिया यांनी सांगितले. यातील मृत जवान मिश्रा हा उत्तर प्रदेशातील देवरियाचा होता, तर जितेंद्र राजस्थानमधील दौसा येथील आहे. त्यांचे मृतदेह सुरतगड मिलिटरी स्टेशनमध्ये नेण्यात आले. (Bikaner)
अशा प्रकारे स्फोट होऊन दुर्घटना घडण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. रविवारी अशीच दुर्घटना घडली होती. त्यात चंद्र प्रकाश पटेल यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा :
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी
- अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘मविआ’ आमदारांचे ‘वॉक आऊट’
- Uddhav Thackeray : आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करा