Home » Blog » BhairaviMata : खंडेनवमीला अंबाबाईची भैरवीमाता रुपात पूजा

BhairaviMata : खंडेनवमीला अंबाबाईची भैरवीमाता रुपात पूजा

by प्रतिनिधी
0 comments
BhairaviMata

कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाईची शारदीय नवरात्रोत्सवाच्या करवीरनिवासिनी अंबाबाईची भैरवीमाता (त्रिपुरभैरवी) रुपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली. घरोघरी नऊ दिवस खाऊच्या पानावर बसलेले देवांची आज नव्याने पूजा करुन देव खाऊच्या पानावर बसवण्यात आले. खंडेनवमी निमित्त घरोघरी, कारखाने, व्यापार आणि उद्योगाच्या ठिकाणी शस्त्रात्रांचे पूजन करण्यात आले. (BhairaviMata)

अंबाबाईची भैरवीमाता रुपात पूजा बांधण्यात आली. देवीचा तेजस्वी वर्ण हजारो उगवत्या सूर्याप्रमाणे आहे.  देवीच्या केशजटांमध्ये चंद्रकला शोभत आहे. तिच्या चारही हातात जपमाळा , ग्रंथ आहेत. ती अभय व वरदहस्त शोभत आहेत.  देवी त्रिनेत्री असून तिच्या मुख्यावर मंद स्मित आहे.  

भैरवीमाताची प्राचीन ग्रंथात अशी माहिती आहे की, जेव्हा महाकाली माता स्वतः मूळ रुपात व्यक्त होण्याच्या इच्छेने, काही काळ गुप्त झाली. तेव्हा शिवांनी कालीमातेला शोधण्यासाठी देवर्षी नारदांना आज्ञा केली, शिवाज्ञेनुसार नारदांना सुमेरू पर्वताच्या उत्तरेस श्री देवीमाता दिसली.  तेव्हा तिच्यासमोर नारदांनी शिवांशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला.  तेव्हा तिच्या शरीरातून एका सुकोमल, तेजस्वी षोडशवर्षी युवती प्रगट झाली, श्री काली मातेच्या शरीरातून व्यक्त झालेल्या, या छायाविग्रहास ‘त्रिपुरभैरवी’ म्हणतात. ही दशमहाविद्यांमधील पाचवी देवता असून, कल्पभेदानुसार श्री दक्षिणामूर्ति अथवा श्री बटुकनाथ हे हिचे भैरव आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेस प्रगट झालेली, ही देवी श्रीकुलातील असून, उत्तराम्नायपीठस्था आहे. (BhairaviMata)

त्रिपुरभैरवी, कोलेशीभैरवी, रुद्रभैरवी, चैतन्यभैरवी, क्रियाभैरवी, सिद्धिभैरवी, कामेश्वरीभैरवी, षट्कूटाभैरवी देवीचे उपासनाभेद व प्रकार आहेत. देवीच्या उपासनेने संकटनाश, इंद्रियविजय, सर्वत्रउत्कर्ष प्राप्ती, शत्रुनाश, सकलसिद्धिलाभ, आरोग्यप्राप्ती, सौख्यलाभ लाभ होतात. (BhairaviMata)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00