Home » Blog » बावडेकर चषक सेंट झेवियर्सने पटकावला

बावडेकर चषक सेंट झेवियर्सने पटकावला

by प्रतिनिधी
0 comments
Bawdekar Cup was won by St. Xavier's

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर स्पोर्ट्‌स्‌‍ असोसिएशन आयोजित  व नीलराजे पंडित-बावडेकर पुरस्कृत भैय्यासाहेब बावडेकर स्मृतीचषक १६ -वर्षाखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद  सेंट झेवियर्स हायस्कूलने पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा ३८ धावांनी पराभव केला.  संस्कार पाटील(मालिकावीर, सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज), शिवजीत इंदुलकर(उत्कृष्ट फलंदाज) या खेळाडूंना गौरवण्यात आले. पीरवाडी येथील मैदानात स्पर्धा खेळवण्यात आली. (Bawdekar Cup was won by St. Xavier’s)

अंतिम सामना सेंट झेवियर्स हायस्कूल  व  संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलयांच्यात सामना खेळवण्यात आला. सेंट झेवियर्स हायस्कूलने ३८ धावांनी जिंकला. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष असून श्री. नीलराजे पंडित-बावडेकर ही स्पर्धा पूरस्कृत करतात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण १२ संघांच्यामध्ये ११ सामने खेळविणेत आले. (Bawdekar Cup was won by St. Xavier’s)

प्रथम फलंदाजी  करताना सेंट झेवियर्स हायस्कूलनेमर्यादित २३ षटकात  सर्व विकेटस्‌‍ गमावून १२७ धावा झाल्या. यामध्ये शिवजीत इंदुलकरने ३८, शौर्य मंगेशकरने ३४ संस्कार पाटीलने १३, सुधांशू जाधवने १० धावा केल्या.  अलोक पाटीलने १६ धावात ४ विकेट्स्‌‍, निल पटेलने २३ धावात ३ विकेट्स्‌‍, चैतन्य दीक्षितने २ विकेट्स्‌‍ व तक्षने १ विकेटघेतली. (Bawdekar Cup was won by St. Xavier’s)

प्रत्युत्तरादाखल खेळताना  संजय घोडावत स्कूलचा  डाव १७.४षटकात सर्वबाद ८९ आटोपला. यामध्ये चैतन्य दीक्षितने १६, परम पटेलने १४, निल पटेलने १२, अद्वैत नार्वेकरने ११ धावा केल्या.सेंट झेवियर्स हायस्कूलच्यासंस्कार पाटीलने ११ धावात ४, समर्थ कापशिकरने २१ धावात ३, शौर्य वर्धनने १ विकेट घेतली.

स्पर्धेचा बक्षीस वितरण  नीलराजे पंडित-बावडेकरयांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी फायनान्स व क्रिकेट सेक्रेटरी नंदकुमार बामणे, कार्यकारिणी सदस्य दिपक घोडके,  केदार गयावळ, के.एस.ए. क्रिकेट समीती सदस्य  प्रतिक जामसांडेकर व पंच उपस्थित होते.

     विजेता संघातील खेळाडूंची नांवे: शिवजीत इंदुलकर, संस्कार पाटील, श्रीवर्धन आपके, सुधांशू जाधव, ऋग्वेद शेट्टे, शौर्य माणगांवकर, समर्थ कापशिकर, सिद्धाजी गायकवाड, ईशान बिरांजे, शौर्यवर्धन कोळी, अरूयुष चौगुले, समर्थ चव्हाण व प्रशिक्षक – ॲलन फर्नांडिस व स्वप्निल वांद्रे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00