मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. (Bail granted to accused in Dabholkar murder case)
पुणे न्यायालयाकडून अंदुरे,कळसकरला जन्मठेप
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील व्ही.आर. शिंदे पुलावर मॉर्निंग वॉकला गेले असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करुन त्यांना ठार मारले होते. पोलिसांनी या गुन्ह्यात अनेकांना अटक केले आहे. पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा सुरवातीला तपास केला. २०१८ मध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळकरला ऑगस्ट २०१८ मध्ये अटक केली. दोघांनी दाभोळकरांवर गोळीबार केला होता असा दावा सीबीआयने केला होता. त्यांच्याविरोधात पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. कोर्टाने दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. (Bail granted to accused in Dabholkar murder case)
उच्च न्यायालयाकडून यापूर्वीच कळसकरला जामीन.
कोर्टाच्या निर्णयाविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. दरम्यान दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर्षी एप्रिल २०२६ मध्ये शरद कळसकरला जामीन मंजूर झाला होता. आता मंगळवारी सचिन अंदुरेला जामीन मंजूर झाला आहे. (Bail granted to accused in Dabholkar murder case)