Home » Blog » CM criticizes Raj Uddhav: दोघा भावांनी एकत्र यावं आणि… : फडणवीस

CM criticizes Raj Uddhav: दोघा भावांनी एकत्र यावं आणि… : फडणवीस

by प्रतिनिधी
0 comments
CM criticizes Raj Uddhav

मुंबई : विशेष प्रतिनिधी : दोघा भावांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावा, एकत्रित जेवण करावे आमची हरकत असायचे काहीच कारण नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. (CM criticizes Raj Uddhav)

दोघा भावांनी एकत्र येऊ नये असा मी जीआर काढला आहे का, असा प्रतिसवालही फडणवीस यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे तुम्ही हिंदीसक्तीचा जीआर मागे घेतला का असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले.

त्रिभाषा सूत्रासंबंधी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता तो त्यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या त्यांच्या विश्वासू नेत्याने लिहिलेला होता. त्यात पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करण्याचा उल्लेख आहे. तो अहवाल उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला. (CM criticizes Raj Uddhav)

ठाकरेंनी हा अहवाल कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि नेहमीप्रमाणे घूमजाव केले, पण आम्ही कुठलाही अहंकार न बाळगता निर्णय घेतला. आम्ही आता त्रिभाषा सूत्रासंबंधी समिती स्थापन केली आहे. ती समिती काही निर्णय घेईल. या प्रश्नावर आम्ही कुठल्याही पक्षाचे हित बघणार नाही. आमचे विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य असेल. जे विद्यार्थ्यांच्या हिताचे असेल ते आम्ही करू, असे फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मला अतिशय आनंद आहे. दोन भाऊ एकत्र येवोत, त्यांनी क्रिकेट खेळावा, हॉकी खेळावा, स्वीमिंग करावे, जेवण करावे, आम्हाला काहीही अडचण नाही. (CM criticizes Raj Uddhav) आता राज ठाकरे जो प्रश्न विचारताहेत तो त्यांनी एकदा उद्धव ठाकरेंना विचारावा. हे सगळे दुटप्पी लोक आहेत, यांचे सत्तेतले रुप वेगळे असते, विरोधातले वेगळे असते, खासगीतले आणखी वेगळे असते, पण आम्ही महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणार आहोत, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00