मुंबई : प्रतिनिधी : माजी आमदार बाबा सिद्दीकींची दसऱ्याच्या दिवशी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हत्या झाली. पोलिसांनी घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या दोघांना पकडले. या गुन्ह्यात पोलिसांनी २६ आरोपींना अटक केली. लॉरेन्स बिष्णोई गँगने ही हत्या घडवून आणली होती, असा दावा केला आहे. बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकीने वडिलांच्या खासगी डायरीत भाजपाचे नेत्याचे नाव असल्याचे सांगितले. या गुन्ह्यात १० बांधकाम व्यावसायिकांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. वडिलांच्या हत्येपूर्वी मोहीत कांबोज यांचे वडिलांशी मोबाईलवर अर्धा तास बोलणे झाले होते, याकडे झिशान सिद्दीकींनी लक्ष वेधले आहे. (baba siddiqui diary)
बाबा सिद्दीकी हत्येच्या खटल्यात पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र सादर केले आहे. त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगला बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी जबाबदार धरले आहे. सलमान खानच्या जवळीकीमुळे बाबा सिद्दीकींची हत्या अनमोल बिश्नोईने केली असे मुंबई पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. या आरोपपत्रावर झिशान सिद्दीकेने यापूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हत्येच्या तपासात बिल्डरचा संबंध आहे, पण पोलीस बिल्डरशी संबंधित अँगलचा तपास करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान यांनी दहा बिल्डर्सची नावे दिले आहेत. बांद्रातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरुन आपल्या वडिलाबरोबर बिल्डर्सचे मतभेद होते असे त्यांनी सांगितले आहे.(baba siddiqui diary)
१० बांधकाम व्यावसायिकांची नावे
झिशान सिद्दीकीनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलिसांना जबाब दिला आहे. जबाबात झिशानने असे म्हटले आहे की बांद्रा ईस्ट आणि बांद्रा वेस्टमधील एसआरएमधील लाभार्थ्यांसाठी ते लढत होते. या योजनेतील काही बिल्डर लोकांवर अन्याय करत होते. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवलिक वेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुंद्रा बिल्डर्स, विनय ठक्कर, ओमकार बिल्डर्स आणि भाजप नेते मोहित कांबोज यांच्यासह अनेक बांधकाम व्यावसायिकांशी माझा वडिलांचा नियमित संपर्क होता.
बिल्डर्सकडून शिविगाळ
झिशान यांनी सांगितले की, माझ्या वडिलांची खासगी डायरी होती. डायरीत त्यांनी स्वत:विषयी लिहिले आहे. १२ ऑक्टोबर २०२४ च्या डायरीतील नोंदीत मोहित कांबोज यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्याच दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या झाली होती. हत्येपूर्वी सायंकाळी साडेपाच ते सहा या वेळेत व्हॉटस अप कॉलवर बाबा सिद्दीकींशी बोलणे झाले होते. भाजप नेते मोहीत कांबोज हे बांद्रा ईस्टमधील मुंद्रा बिल्डर्स प्रकल्पासंदर्भात ते वडिलांशी भेटणार होते. वडिलांचे काही व्हिडिओ मला मिळाले आहेत. त्यामध्ये बिल्डर झोपडपट्टीवासियांशी संपर्क करताना माझे वडील बाबा सिद्दीकींना अपशब्द वापरत होते, असा दावा झिशान यांनी केला आहे. झिशान सिद्दीकींनी सर्व प्रकल्पाच्या चौकशीची मागणी केली आहे.(baba siddiqui diary)
जबाबात अनिल परब यांचेही नाव
झिशान सिद्दीकींनी आपल्या जबाबात, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचेही नाव घेतले आहे. परब यांनी एसआरए योजनेसंबधी झोपडपट्टीवासीयांशी बैठक घेतली होती. दरम्यान मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांनी असे सांगितले की तपास अधिकारी पथकाने कुठल्याही पैलूसंबंधी नकार दिलेला नाही. सिद्दीकींच्या जबाबातील म्हणण्यानुसार चौकशी केली जाईल. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी काही लोकांचे जबाब घेण्यात येणार आहे. आवश्यकता पडली तर पुरवणी आरोपपत्रही दाखल केले जाईल. पण सुरवातीच्या तपासात झिशान सिद्दीकींनी जे आरोप केले आहेत त्याबद्दल कुठेही साक्ष मिळालेली नाही.
हेही वाचा :
चिनी डीपसीकने अमेरिकेला भरवली धडकी
आयसीसी बँकेच्या मॅनेजरचा कोटीला गंडा