Home » Blog » अविनाश जाधव यांचा २४ तासात ‘यु टर्न;’ 

अविनाश जाधव यांचा २४ तासात ‘यु टर्न;’ 

राजीनामा घेतला मागे

by प्रतिनिधी
0 comments
Avinash Jadhav file photo
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीतील दारू पराभवाची जबाबदारी स्वीकारत ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांनी यु-टर्न घेतला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार आपण पूर्वीप्रमाणेच पक्षासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी  एक्स’ वर म्हटले आहे.
जाधव यांनी ठाणे,पालघरमधील  पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे रविवारी (दि.१)  राज ठाकरेंना  लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.  जाधव यांनी स्वतः ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात ते तिसऱ्या स्थानावर राहिले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन  राजीनामा दिलेल्या जाधव यांना राज ठाकरे यांनी कार्यरत राहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करत आपण पक्षासाठी कार्यरत राहणार असल्याचे म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00