दिल्ली : प्रतिनिधी : अजित पवार विमान अपघातातील व्हीएसआर विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीच्यामागे काही प्रभावशाली लोकांचा हात आहे. त्यामुळे कंपनीवर कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात आमदार पवारांनी केलेल्या राजीनामा मागणीचे पडसाद लोकसभेत उमटण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातासंबधी आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी अपघाताचा तपास संथ गतीने होत आहे याकडे लक्ष वेधत चौकशी निपक्षपाती न करता गुंडाळली जाऊ शकते अशी भिती व्यक्त केली. चौकशीमध्ये हस्तक्षेप होण्याची भिती व्यक्त करताना डीजीसीएतील अधिकारी कॅप्टन श्वेता सिंह यांच्यावर गंभीर आरोपही त्यांनी केले. (Rohit Pawar demands resignation of Aviation Minister Naidu)
रोहित पवार यांनी यापूर्वीच विमानात अतिरिक्त इंधन का भरण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत विमानात जाणीवपूर्वक पेट्रोल साठा होता का त्यामुळे विमानाचा घातपात करण्याच शंकाही व्यक्त केली. त्यांनी व्हीएसआर कंपनीतील अनियिमतेचे पुरावे दाखवून कंपनीला पाठीशी घातल्याचा आरोप केला. कंपनीचे प्रमुख रोहित सिंग यांना पाठीशी घातले होते.
राममोहन नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. व्हीएसआर कंपनीला काही प्रभावशाली लोकांचा पाठिंबा आहे असाही त्यांनी आरोप केला. अपघातातील रिपोर्टस् उशीर होत आहे म्हणजेच त्याच्याशी छेडछाड होत आहे असेही ते म्हणाले. (Rohit Pawar demands resignation of Aviation Minister Naidu)
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात विमान प्राधिकरणाकडून मला माहिती मिळत नाही पण माझ्यावर ट्रोल करणाऱ्या माहिती मिळते असा आरोपही रोहित पवार यांनी केला. विमान अपघातासंबधी मी प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यानंतर भाजप पुरस्कृत ट्रोलर्स सक्रीय झाले आहेत. मी कुठे फिरत आहे. कोणत्या विमानाने प्रवास करतो. माझ्यासोबत कोण प्रवास करततात यांची माहिती ट्रोलर्संना मिळत आहे. पण अजित दादांच्या विमान प्रवासबद्दल कोणतीच माहिती दिली जात नाही. माहिती अधिकारातही मिळत नाही. मग माझी माहिती ट्रोलर्संना कशी मिळते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Rohit Pawar demands resignation of Aviation Minister Naidu)