Home » Blog » शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

by प्रतिनिधी
0 comments
Councilwoman's husband murdered in Khopoli

जमीर काझी : मुंबई :  रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपालिकेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे असे त्यांचे नाव असून सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राजकीय वैमन्स्यातून राष्ट्रवादीच्या गुंडानी हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनी केला आहे. 

 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. घाव वर्मी लागल्याने रक्तबंबाळ होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर त्याच गाडीतून पसार झाले. मिळताच, खोपोली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे च रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले. (Councilwoman’s husband murdered in Khopoli)

मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी मंगेश काळोखे नुकत्याच झालेल्या खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. खोपोलीसारख्या शांत, आणि जातीय सलोखा राखणाऱ्या डोंगरकुशीतील छोटेखानी शहरात हत्या झाल्यामुळे खोपोलीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ खोपोली शहर बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि शहरप्रमुख संदीप पाटील यांनी केली आहे. (Councilwoman’s husband murdered in Khopoli)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00