Home » Blog » Asia Cup Cricket : भारत पाक क्रिकेट सामना १४ सप्टेंबरला

Asia Cup Cricket : भारत पाक क्रिकेट सामना १४ सप्टेंबरला

by प्रतिनिधी
0 comments
Asia Cup Cricket

नवी दिल्ली : दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर अशिया कप २०२५ स्पर्धेस प्रारंभ होत आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बुधवारी १० सप्टेंबर रोजी यजमान संयुक्त अरब अमिरातीविरोधात सलामीचा सामना खेळणार आहे. भारतीय उपखंडातील कट्टर पारंपरिक संघ म्हणून ओळख असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारी १४ सप्टेंबरला होणार आहे. (Asia Cup Cricket)

स्पर्धेस जरी बुधवारी प्रारंभ होत असला तरी एक दिवस आधी ९ सप्टेंबर रोजी अबु धाबीच्या झायेद स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात सामना होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय भारत संघ मैदानात उतरणार असून याआधी नऊ वेळा भारतीय संघाने अशिया चषकावर आठवेळा नाव कोरले आहे. युएई विरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर भारताचा दुसरा सामाना १४ सप्टेंबर रोजी दुबईत होणार आह. अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. (Asia Cup Cricket)

आशिया कप गट

गट अ: भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, ओमानगट ब: श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग

आशिया कप स्थळे

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबईशेख झायेद स्टेडियम, अबू धाबी.

भारताचे सामने असे

भारत वि. संयुक्त अरब अमिरात, बुधवार १० सप्टेंबर.

भारत वि. पाकिस्तान, रविवार, १४ सप्टेंबर.  

भारत वि. ओमान, शुक्रवार, १९ सप्टेंबर. (Asia Cup Cricket)

You may also like

error: Content is protected !!