Home » Blog » Army foils infiltration bid: घुसखोरी उधळली; जवान शहीद

Army foils infiltration bid: घुसखोरी उधळली; जवान शहीद

by प्रतिनिधी
0 comments
Army foils infiltration bid

जम्मू : भारतीय लष्कराने बुधवारी (१३ ऑगस्ट) सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान एका भारतीय लष्करी जवान शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे, असे वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले आहे. (Army foils infiltration bid)

या भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी याच भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

“भारतीय लष्कराने आज सकाळी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने याच भागात दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. आज घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना एका भारतीय लष्करी जवानाला आपले प्राण गमवावे लागले. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे,” असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Army foils infiltration bid)

सांबाच्या जिल्हा दंडाधिकारी आयुशी सुदान यांनी यांनी बीएसएफच्या कारवायांना पाठिंबा देण्यासाठी आणि सुरक्षा बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेपासून २ किमी अंतरापर्यंतच्या भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे. (Army foils infiltration bid)

पुढील दोन महिन्यांसाठी दररोज रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू केले जातील, असे सांगण्यात आले.

जिल्हा दंडाधिकारी सुदान यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या हालचालीवर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत जेणेकरून सीमेवर देखरेख वाढविण्यात येईल. बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा संस्थांशी समन्वय साधून हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा
मतचोरीचा ॲटम बॉम्ब आणि निवडणूक आयोगाचा चोरबाजार
तुम्ही कशावरून भारतीय नागरिक आहात?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00