Home » Blog » भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे आजारी

भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे आजारी

आ. रोहित पवार यांचा टोला; आंदोलन करण्याकडे दुर्लक्ष

by प्रतिनिधी
0 comments
Anna Hazare file photo

अहमदनगर : प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील, त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत, असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. महायुतीचे सरकार आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा आहे, असे ते म्हणाले.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे ‘ईव्हीएम’ मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलन करत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना आ. पवार यांनी हजारे यांना खोचक टोला लगावला आहे. आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत; मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्याने हजारे आंदोलन करत नाहीत. ते आजारी असतील. त्यामुळे आराम करत असतील, असे ते म्हणाले.

महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार, यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली आहे. याबाबत आ. पवार यांनी प्रतिक्रिया देताना भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे म्हटले आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षांच्या अशा जागा आल्या आहेत, की अजित पवार यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर शिंदे यांची चांदी आहे. दुसरीकडे शिंदे यांनी भाजपला अडचणी करण्याचा प्रयत्न केला, तर अजित पवार यांची चांदी आहे, अशी सध्याची स्थिती आहे; मात्र या गोष्टी दोघांना माहीत असल्याने त्यांना भाजपचे ऐकण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. शिंदेंचे मोदी-शाह यांनाच आव्हान

प्रा. राम शिंदे यांनी फेरतपासणीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आ. पवार यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. प्रा. शिंदे यांनी फेरतपासणी करण्याची मागणी करत एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले पवार यांनी म्हटले. ‘व्हीव्हीपॅट’मध्ये काही गोंधळ आहे, असे मला वाटत नाही; पण ‘ईव्हीएम’मध्ये गोंधळ असल्याचे त्यांनी सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00