पुणे: भारतीय माहिती सेवेतील अधिकारी अंकुश चव्हाण यांची संरक्षण मंत्रालयाच्या पुणे येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांनी उपसंचालक आणि जनसंपर्क अधिकारी निखिल देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला.त्यांच्याकडे आर्मी, नेव्ही,एअर फोर्स आणि डिफेन्स इन्स्टिट्यूटच्या जनसंपर्काची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर, योजना मासिकाचे संपादक आणि प्रकाशन विभाग पुणे या कार्यालयांचा अतिरिक्त प्रभार अंकुश चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. श्री. चव्हाण माहिती आणि प्रसारण मंत्रालयानासह विविध विभागांमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यापूर्वी अंकुश चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनामध्ये पाणीपुरवठा स्वच्छता विभाग व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांमध्ये अधिकारी म्हणून कार्य केले आहे. त्यांनी पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.