कणकवली : प्रतिनिधी : शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मतदारांना पैसे वाटप करत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकली. त्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात २५ लाख रुपये मिळाले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आमदार राणे यांनी टीका केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आमदार निलेश राणे यांनी धाड टाकून पैसे वाटप घटनेचा पर्दापाश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राणे यांचे कौतुक केले. (Pawar congratulates Rane)
रवींद्र चव्हाणकडून पदाधिकाऱ्याच्या घरी पैसे
आमदार राणे यांनी धाड टाकताच मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित घराची पाहणी केली. तेव्हा निलेश राणे यांनी पोलिसांशी संवाद साधताना म्हटले की, निवडणुकांसाठी अजून सहा दिवस बाकी आहे. माझ्याकडे यादी आहे, परंतु आज भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात २० ते २५ लाख सापडले आहेत. रविंद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी पैसे आले आहेत. त्यामुळे तुम्ही या लोकांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा किंवा कडक कारवाई करा, नाहीतर मी स्वत: यांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देतानाच निलेश राणे यांनी दिला. (Pawar congratulates Rane)
महायुतीतील मित्र पक्षातील राजकारण उफाळले
आमदार निलेश राणे यांनी धाड टाकल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. आमदार निलेश राणे यांचे बंधू मंत्री नितेश राणे हे भाजपमध्ये आहेत. नगरपालिका भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करत असतानाच त्यांच्या भावाने भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकल्याने महायुतीतील मित्र पक्षातील राजकारण उफाळून निघाल्याची चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनीही भाजपवर टीका करण्यासाठी संधी मिळाली आहे. (Pawar congratulates Rane)
रोहित पवारांकडून भाजपवर शरसंधान
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर टीका करताना भाजपवर शरसंधान केले आहे. रोहित पवार यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये रोहित पवार यांनी असे म्हटले आहे की, “निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आ. निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे.. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं. (Pawar congratulates Rane)