Home » Blog » Alcaraz : अल्कारेजने जिंकली यूएस ओपन स्पर्धा

Alcaraz : अल्कारेजने जिंकली यूएस ओपन स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Alcaraz

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारेज विजेता ठरला. त्याने अंतिम सामन्यात जॅनिक सिनरचा ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा विजय मिळवला. त्याचे हे सहावे ग्रँड सलॅम विजेतेपद ठरले. यावर्षी अल्कारेज आणि सिनर सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत लढले. अंतिम सामना पाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. (Alcaraz)

अंतिम सामन्यात पावसामुळे बंद कोर्टात सामना खेळवण्यात आला. सुरवातीपासून अल्कारेजने गतविजेता सिनरवर दबाव ठेवला होता. दोन महिन्यापूर्वी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सिनरकडून अल्कारेज पराभूत झाला होता. त्याचा बदला अल्कारेजने सिनरवर विजय मिळवत घेतला.

पहिल्या सेटमध्ये सिनर सर्व्हिस भेदत अल्कारेजने ६-२ असा सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिनरने खेळावर नियंत्रण ठेवत अल्कारेजला दबावात ठेवले. दुसरा सेट सिनर ६-३ असा जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी आणली. तिसऱ्या सेटमध्ये अल्कारेजने वेगवान खेळत ६-१ असा सेट जिंकला. चौथ्या सेटमध्ये सिनरने परत कडवी झुंज दिली. पण अल्कारेजने ६-४ असा सेट जिंकून अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले. (Alcaraz)

अल्कारेजने ही स्पर्धा जिंकत रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर झेप घेतली. अल्कारेज आणि सिनर यांच्यातील सामन्यात अल्कारेज १०-५ अशी बढत घेतली आहे. २२ वर्षी अल्कारेजने २४ वर्षीय सिनरकडे असणारे प्रथम मानांकन खेचून घेतले. (Alcaraz)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00