Home » Blog » अजित पवार यांच्या विमानाचा घातपात?  

अजित पवार यांच्या विमानाचा घातपात?  

by प्रतिनिधी
0 comments
Ajit Pawar's plane crashes

जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित दादांचा दौरा अचानक का बदलला? विमानाचा मुख्य पायलट का बदलला?,वेळेची विसंगती का ? सर्व क्लिअर नसतानाही विमान टेक ऑफ आणि लँड का करण्यात आले आणि त्यासाठी रनवे -११ च का पाहिजे होता? मुख्य पायलट आणि बदललेल्या पायलटचे कॉल डिटेल्स तपासले का?, अशा अनेक महत्वाच्या शंकाची सरबत्ती करताना विमानामागे घातपात असल्याबद्दल १०० टक्के शंकेला वाव आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केला.

 अजित पवार यांच्या विमान अपघाताला १३ दिवस उलटल्यानंतर त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद घेत अपघाताच्या अनुषंगाने उपस्थित विविध शंकाचे तांत्रिक तपशीलासह स्लाईड शोद्वारे सादरीकरण करीत अनेक मुद्दे पुराव्यानिशी सादर केले. 

गेल्या १३-१४ दिवसात सरकारने फक्त सीसीटीव्ही गोळा केले आहे.पण बाकी काही केले नाही. चौकशीसुद्धा केली नाही. जर असाच उशीर केला तर सगळे मॅनेज केले जाईल,” अशी भीती व्यक्त करून व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून याबाबत सरकारसोबतच जगविख्यात विमान वाहतूक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सदर विमान दुर्घटनेची निष्पक्षपणे चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी केली. हे विमान दोन दिवसापूर्वी सुरतला गेले होते, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून माझ्या काकांच्या अपघातामागील कारणाचा छडा मी लावणारच, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Ajit Pawar’s plane crashes)

 ते म्हणाले की, २८ जानेवारीला सकाळी ७ वाजून ०२  मिनिटांनी अजितदादांचे क्रू तयार झाले होते. त्यानंतर एक मिनिटांनी बारामती येथील हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी ८.४५  दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल, तर 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत अशी बातमी समोर आली आणि ९.४५ वाजता ते गेल्याची बातमी समोर आली होती. विमानाच्या मालकाने हवामानामुळे अपघात झाला असावा, असे सांगितले होते. मात्र ग्रामपंचायत सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर लक्षात येते की, कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून, यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होते. मॅकेनिकल फेल्युअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रूटीन मेंटेनस झाला नव्हता का? असे प्रश्न उपस्थित करून रोहित पवार म्हणाले,’ विमानाचे व्यवस्थित तपासणी झाली होती का? तपासणी करणाऱ्या कंपनीला पकडले पाहिजे, आम्ही सरकारमध्ये नाही, टेकलॅाग सुद्धा शोधावे लागणार आहे. रूटीन मेंटेनेन्स झाले होते का? जिथे खासगी विमाने ठेवली जातात तिथे खूप सीसीटीव्ही होते. रोहित पवार यांनी व्यक्त केली. (Ajit Pawar’s plane crashes)

दादांचा दौरा का बदलला?

विमानाचा पायलट का बदलला?,  वेळेची विसंगती का आली? सर्व क्लिअर नसतानाही विमान टेक ऑफ आणि लँड का करण्यात आलं? रन वे- ११ च का पाहिजे होता? निश्चित पायलट आणि बदललेल्या पायलटचे कॉल डिटेल्स तपासले का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

विमान अपघातावर प्रश्नचिन्ह

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांत बारामती विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मग विमान दुर्घटनेतून पाच जणांचेच मृतदेह कसे बाहेर आले,असा सवाल उपस्थित केला.

त्यांना शपथविधीची घाई

  संपूर्ण पवार कुटुंबीय दुःखात असताना दादांच्या पक्षाचे काही नेते मात्र वेगळ्या गोष्टीला प्राधान्य देत होते. त्यांच्यादृष्टीने सुनेत्रा काकीचा शपथविधी महत्वाचा होता, असे सांगून रोहित पवार म्हणाले, या घाईमुळे काकी, पार्थसाठीही धक्का बसला होता. या नेत्यांना काय वाटत आहे, त्याच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. ‘ (Ajit Pawar’s plane crashes)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00