Home » Blog » परभणी महापौरपदी शिवसेनेचे सय्यद इकबाल यांची निवड

परभणी महापौरपदी शिवसेनेचे सय्यद इकबाल यांची निवड

by प्रतिनिधी
0 comments
Shiv Sena's Syed Iqbal elected as Parbhani Mayor

परभणी : चंद्रपूरमध्ये महापौरपदाची संधी गमावल्यानंतर आता परभणी महानगरपालिकेत शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. शिवसेनेचे सय्यद इकबाल यांची महापौरपदी निवड झाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महापौरपदी मुस्लीम चेहरा देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. उपमहापौरपदी गणेश देशमुख यांची निवड झाली आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत सय्यद इकबाल यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना २६ मते मिळाली. महापौरपदासाठी १४ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १२ जणांनी माघार घेतली. महापौरपदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला केला आहे. (Shiv Sena’s Syed Iqbal elected as Parbhani Mayor)

परभणीमध्ये चंद्रपूरप्रमाणे दगाफटका होऊ नये याची काळची स्थानिक शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. शिवसेना ठाकरे गटाने त्यांचे २५ तर काँग्रेसने त्यांचे १२ नगरसेवक सुरक्षित ठेवले होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहूल पाटील, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांनी महापौर निवडीसाठी यंत्रणा हाताळली. (Shiv Sena’s Syed Iqbal elected as Parbhani Mayor)

परभणी महानगरपालिकेत सर्वाधीक मोठा पक्ष शिवसेना ठाकरे पक्ष ठरला आहे. शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत पण बहुमताचा ३३ आकडा गाठण्यासाठी त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली आहे. काँग्रेसचे १२ नगरसेवक आहेत. भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, जनसुराज्यचे तीन, यशवंत सेना आणि अपक्ष नगरसेवक एक निवडून आला आहे. (Shiv Sena’s Syed Iqbal elected as Parbhani Mayor)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00