Home » Blog » Kolhapur News : दारु पिणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई

Kolhapur News : दारु पिणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई

पोलिसांकडून ३१ डिसेंबरला १३२८ केसेस

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur News

कोल्हापूर; प्रतिनिधी : थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करताना कायदा मोडून करुन जल्लोष करणाऱ्यावर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली. दारु पिऊन वाहन चालवणे, उघड्यावर दारु पिणाऱ्या अशा ३२१ जणांवर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यावर कायद्याचा बडगा उगारत पोलिसांनी १३२८ केसेस केल्या आहेत. (Kolhapur News)

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सहा डीवायएसपी, ८० अधिकाऱ्यासह ७०० पोलिस रस्त्यांवर होते. मंगळवारी मध्यरात्री हुल्लडबाजी करणारे वाहनधारक, दारु पिऊन वाहन चालवणे, उघड्यावर दारु पिणाऱ्यांवर पोलिसांनी आपला बडगा दाखवला.

पोलिसांनी चौकाचौकात आणि शहरात येणाऱ्या मार्गावर वाहनधारकांची ब्रेथ अनालायझरने तपासणी केली होती. त्यामध्ये दारु पिऊन वाहन चालवण्याऱ्यावर ड्रंक अन्ड ड्राईव्ह नियमानुसार ३१६ जणांवर केसेस करण्यात आल्या. तसेच उघड्यावर दारु पिणाऱ्या पाच जणांवर कारवाई करुन त्यांच्या केसेस कोर्टात पाठवण्यात आल्या. कारवाई झालेल्या व्यक्तीवर न्यायालयाकडून दंडात्मक अथवा लायसन रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. जल्लोष करत ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या २३७ वाहनधारकांवर केसेस केल्या आहेत. नंबर प्लेट, वन वे चा नियम मोडणे, विना सिट बेल्ट वाहन चालवणे, लायसन्स, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सिग्नल जंप करणाऱ्यांवर कारवाई करुन केसेस करण्यात आल्या. जादा प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या नऊ वाहनांवर कारवाई करण्यात आली. बी.पी. अक्टच्या २० केसेस तर इतर कारवाईखाली ५३८ केसेस करण्यात आल्या. (Kolhapur News)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00