कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालात भाजप महायुती आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. ६८ पैकी ४० जागांचे कल आणि निकाल हाती आले असून काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागांवर तर शिवसेना शिंदे आणि भाजपने सात जागांवर विजय मिळवला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाने चार जागांवर तर शिवसेना ठाकरे गटाने दोन जागावर विजय मिळवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळाली आहे. (A tug-of-war between the BJP-led grand alliance and Congress in Kolhapur ZP)
हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या घुणकी मतदार संघात काँग्रेसच्या शुभांगी कुंभार विजयी झाल्या आहेत. पन्हाळा तालुक्यात सातवे पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. डॉ. प्रदीप पाटील निवडून आले आहेत.
गडहिग्लंगज तालुक्यातील नूल जिल्हा परिषदेत जनसुराज्य अनिरुद्ध रेडेकर विजयी झाले आहेत. आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिरीष देसाई विजयी झाले आहेत.
करवीर तालुक्यात भाजप शिवसेनेने आघाडी घेतले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिये जिल्हा परिषदेत काँग्रेसचे हमु पाटील विजयी झाले आहेत. वडणगेत शिवसेनेच्या इंद्रजीत पाटील यांनी भगवा फडकावला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील गडमुडशिंगी आणि उचगांव जिल्हा परिषदेवर भाजपचे कमल फुलले आहे. गडमुडशिंगीत तानाजी पाटील तर उचगावमध्ये नामदेव वाईंगडे विजयी झाले आहेत.
भुदरगड तालुक्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आघाडी घेतली आहे. कडगाव जिल्हा परिषदेत सारिका नांदेकर यांनी विजय मिळवत शिवसेनेचा झेंडा फडकावला आहे. (A tug-of-war between the BJP-led grand alliance and Congress in Kolhapur ZP)
कोल्हापूर जिल्हा निवडणूक निकाल
कागल तालुका
म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघ, काकासो सावडकर भाजप
सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघ, सुयशा घाटगे, भाजप.
कसबा सांगाव जिल्हा परिषद संघ, सुवर्णा कांबळे, राष्ट्रवादी
नानीबाई चिखली, जि.प.मतदारसंघ, शिवानी भोसले, भाजप
बोरवडे जि.प. मतदारसंघ, शोभाताई फराकटे, राष्ट्रवादी
कापशी जि.प. मतदारसंघ, शिल्पा खोत, राष्ट्रवादी काँग्रेस
पन्हाळा तालुका
कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ, अमरसिंह पाटील, जनसुराज्यशक्ती पुरस्कृत अपक्ष
सातवे जि.प.परिषद मतदारसंघ, डॉ. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
हातकणंगले तालुका
कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ, शीतल यादव, जनसुराज्यशक्ती
भादोले जि.प.मतदारसंघ, सोनाली सावंत, काँग्रेस
घुणकी जि.प. मतदारसंघ, शुभांगी कुंभार, काँग्रेस
भुदरगड तालुका
आकुर्डे जि.प.मतदारसंघ, अर्चना निकम, शिवसेना शिंदे पक्ष
कडगाव, जि.प.मतदारसंघ, सारिका यशवंत नांदेकर, शिवसेना शिंदे पक्ष
पिंपळगाव जि. प.मतदारसंघ, रोहिणी आबिटकर, शिवसेना शिंदे गट
करवीर तालुका
गडमुडशिंगी जि.प.मतदारसंघ, तानाजी पाटील, भाजप
उचगांव, जि.प.मतदारसंघ, नामदेव वाईंगडे, भाजप
वडणगे जि.प. मतदारसंघ इंद्रजीत पाटील, शिवसेना शिंदे गट
शिये जि.प. मतदारसंघ, विश्वनाथ पाटील, काँग्रेस
गडहिंग्लज तालुका
नूल जि.प.परिषद मतदारसंघ, अनिरुद्ध रेडेकर, जनसुराज्य शक्ती पक्ष
शाहूवाडी
बांबवडे जि.प.मतदारसंघ, राजकुंवर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस
गगनबावडा तालुका
तिसंगी जि. प. मतदारसंघ, सोनाली विलास पाटील, काँग्रेस
असळज जि. प.मतदार संघ, संभाजी पाटणकर, काँग्रेस
राधानगरी तालुका
कसबा तारळे जि. प.मतदार संघ, अमृता डोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस
राशिवडे जि.प.मतदारसंघ, सागर धुंदरे, काँग्रेस.
कसबा वाळवे जि.प.मतदारसंघ, अरुण जाधव, शिवसेना शिंदे गट
शिरोळ तालुका
दानोळी जिल्हा मतदारसंघ, नंदिनी संदीप कांबळे , ( महाविकास आघाडी)
दानोळी पंचायत समिती, दीपाली होगले ( महाविकास आघाडी )
कोथळी पंचायत समिती, ज्योती कांबळे ( महाविकास आघाडी)
दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ, उत्तरा विजित शिंदे, ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
दत्तवाड पंचायत समिती , बाबासाहेब वनकोरे ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
टाकळी पंचायत समिती, अविनाश पाटील ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
आलास जिल्हा परिषद मतदारसंघात, प्रशांत शहापूरे ( भाजप)
आलास पंचायत समिती, फैजल पाटील ( राजर्षी शाहू विकास आघाडी),
गणेशवाडी पंचायत समिती, जयश्री माणकापूरे ( स्वाभिमानी शेतकरी संघटना )
उदगाव जिल्हा परिषद, अमोल चव्हाण ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
अर्जुनवाड पंचायत समिती सीमा म्हैशाळे ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
उदगाव पंचायत समिती, दिप्ती जाधव ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ अर्चना अमोल चौगुले ( काँग्रेस )
यड्राव पंचायत समिती प्रतिक पाटील ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
शिरढोण पंचायत समिती, सायली मालगावे ( काँग्रेस.)
नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात, प्रचिता कोळी ( राजर्षी शाहू विकास आघाडी.)
नांदणी पंचायत समिती, निलम म्हेत्रे ( काँग्रेस )
चिपरी पंचायत समिती, प्रविण देसाई ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
अब्दुल्ललाट जिल्हा परिषद मतदारसंघात श्रद्धा गायकवाड ( राजर्षी शाहू विकास आघाडी)
अब्दुल्ललाट पंचायत समिती, मिलिंद कुरणे ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
अकिवाट पंचायत समिती नाना उपाध्ये ( राजर्षी शाहू विकास आघाडी)
आजरा तालुका
पेरणोली जि.प. मतदारसंघ, सुधीर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस
उत्तूर जि.प. मतदारसंघ, शिरीष देसाई, राष्ट्रवादी