Home » Blog » दहा दिवसात पेट्रोल,डिझेल दरवाढीची हॅटट्रीक

दहा दिवसात पेट्रोल,डिझेल दरवाढीची हॅटट्रीक

by प्रतिनिधी
0 comments
A Hat-trick of Petrol and Diesel Price Hikes in Ten Days

नवी दिल्ली : आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने त्याचे चटके भारताला बसू लागले आहेत. सलग दहा दिवसात तीन वेळा पेट्रोलची दरवाढ केली आहे. शनिवारी सकाळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने उगवली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८२ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ९१ पैसे वाढ झाली आहे. दर तीन ते चार दिवसांनी सरकाकडून अशी दरवाढ अशी सुरू राहिली तर एका महिन्यात १५ ते १७ रुपये इंधनाच्या दरात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (A Hat-trick of Petrol and Diesel Price Hikes in Ten Days)

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ होणार याचे संकेत मिळत होते. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ ते २० रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडन व्यक्त केला जात होता. पण १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात तीन रुपये तर डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ करत ग्राहकांना भेट दिली. त्यानंतर चारच दिवसात २० मे रोजी पेट्रोलच्या दरात ८६ पैसे आणि डिझेलच्या दरात ८३ पैसे वाढ केली. त्यानंतर आज शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८७ पैसे तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ झाली. (A Hat-trick of Petrol and Diesel Price Hikes in Ten Days)

पेट्रोल आणि डिझेलचे दर एकदम न वाढवता केंद्र सरकारकडून टप्प्याटप्याने दरवाढ केली जात आहे. दहा दिवसात तीन वेळा पेट्रोल, डिझेल दरात वाढ केली आहे. दहा दिवसात तीन वेळापेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाल्याने पाच रुपयांच्या आसपास दरवाढ झाली आहे.  

दिल्लीत सीएनजीच्या दरात एका रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीचा दर ८१.०९ रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने भारतीय पेट्रोल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. (A Hat-trick of Petrol and Diesel Price Hikes in Ten Days)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00