Home » Blog » राजदीप मंडलिकची महाराष्ट्र संघात निवड

राजदीप मंडलिकची महाराष्ट्र संघात निवड

विजय मर्चंट स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार

by प्रतिनिधी
0 comments
Vijay Merchant Trophy

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू राजदिप मंडलीक याची बीसीसीआय मार्फत घेणेत येणाऱ्या १६ वर्षाखालील विजय मर्चंट (तीन दिवसीय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.  सहा ते ३० डिसेंबर या कालावधीत सुरत येथे स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राचे सामने पुदुच्चेरी, तामिळनाडू, बंगाल, गोवा आणि बडोदा या पाच राज्याविरुध्द होणार आहेत. पहिला सामना सहा डिसेंबर रोजी पुदुच्चेरी बरोबर होणार आहे. दुसरा सामना तामिळनाडूबरोबर तर तिसरा सामना पश्चिम बंगाल बरोबर होणार आहे. चौथा सामना २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत गोवा राज्याबरोबर होणार आहे. पाचवा सामना २८ ते ३० डिसेंबर रोजी बडोदा संघाबरोबर सामना होणार आहे. (Vijay Merchant Trophy)

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00