कोल्हापूर : जम्मू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या सांघिक गटामध्ये महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघास तृतीय क्रमांक (ब्राँझ पदक) मिळाला. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची खेळाडू निहाली नलिनी निवास पाटील हिने उल्लेखनीय असा उत्कृष्ट खेळ करून संघास कास्यपदक मिळवून देणेत मोलाची भूमिका बजावून राज्याचा गौरव वाढविला आहे. केएसएच्या टेबल टेनिस प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक संग्राम चव्हाण यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली निहाली सराव करते. (Nihali Patil’s success in the National Table Tennis Championship)
तिला संस्थेचे पेट्रन-इन्-चीफ् खासदार शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, मधुरिमाराजे, सचिव माणिक मंडलिक,ऑन. टेबल टेनिस सचिव नितीन जाधव यांचे प्रोत्साहन लाभले तर केएसएचे टेबल टेनिस कोच संग्राम चव्हाण व सहाय्यक कोच शिवतेज खराडे यांचे मार्गदर्शन लाभले. (Nihali Patil’s success in the National Table Tennis Championship)