Home » Blog » ‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर

आदित्यनाथ यांच्या विधानावर महाविकास आघाडीकडून भाजपा लक्ष्य

by प्रतिनिधी
0 comments
yogi adityanath file photo

मुंबई : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर केला जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

‘कटेंगे’ ला ‘जोडेंगे’ चे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घोषणेवरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहे. निवडणुका येतात आणि जातात; पण दोन धर्मांमध्ये किंवा दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करता कामा  नये. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या घोषणेवरून भाजपला लक्ष्य केले. एका प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले, की भाजपचे लोक आता ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहेत; मात्र आम्ही कुणाला कापूही देणार नाही आणि महाराष्ट्र लुटूही देणार नाही. भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ ला काँग्रेसने ‘जुडेंगे तो जीतेगे’ ने प्रत्युत्तर दिले आहे.

अजितदादा दूर

भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेपासून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या या राज्यात अशा घोषणांना काहीच अर्थ नाही, अशी त्यांची भूमिका आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00