Home » Blog » दिवाळीत  एसटीची १६ दिवसांत ५४८ कोटींची कमाई

दिवाळीत  एसटीची १६ दिवसांत ५४८ कोटींची कमाई

by प्रतिनिधी
0 comments
ST earns ₹548 crore over 16 days during Diwali

जमीर काझी : मुंबई :  दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासह परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला भरभरून पसंती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १६ दिवसांत एसटीने तब्बल ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या कालावधीत दररोज सरासरी ३४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई झाली असून  दिवाळीच्या शेवटच्या दिवशी  १६ नोव्हेंबर परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीने एकाच दिवसात ४६ .५३ कोटी   रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवण्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. (ST earns ₹548 crore over 16 days during Diwali)

ऑक्टोबर महिन्यात महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील सक्तीमुळे तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात दिवाळी  आणि महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत देण्यात आलेली शिथिलता यामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठी चालना मिळाली आहे. खासगी वाहतुकीच्या तुलनेत सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय म्हणून एसटीने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. (ST earns ₹548 crore over 16 days during Diwali)

एसटीच्या या  कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील तमाम प्रवाशांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एसटी महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे. (ST earns ₹548 crore over 16 days during Diwali)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!