कोल्हापूर : प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी दणदणीत विजयाची नोंद केली. तासगाव सोसायटी गटात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमन पाटील यांचा एक मताने पराभव केला. कवठेमहांकाळ सोसायटी गटातून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे तर मिरज गटातून पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे यांनी विजय मिळवला. (Gopichand Padalkar’s victory in Sangli District Bank)
आमदार पडळकरांना ८८ पैकी ५४ मते
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात आले. २१ पैकी १५ जागा बिनविरोध निवडून आल्या. तर दुष्काळ तालुके असलेल्या जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव सोसायटीत गटात निवडणूक लागली. संपूर्ण राज्याचे लक्ष जत सोसायटी गटाकडे होते. तिथे गोपीचंद पडळकर आणि भाजपचेच विनोद पवार यांच्यात लढाई झाली. गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाने अवैध ठरवला. त्याला पडळकरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर पडळकरांच अर्ज वैध ठरला. या गटात मोठ्या आर्थिक घडामोडी घडल्या. एकूण ८८ मतापैकी ५४ मते मिळवत पडळकरांनी विजय संपादन करत प्रस्थापितांना धक्का दिला. (Gopichand Padalkar’s victory in Sangli District Bank)
माजी आमदार सुमनताई पाटील पराभूत
तासगाव सोसायटी गटात माजी खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्यात काटा लढत झाली. संजयकाका पाटील यांना ३९ तर आमदार सुमन पाटील यांना ३८ मते पडली. संजयकाका एक मताने विजयी झाली. या विजयाने संजयकाकांचे राजकीय पुनरुज्जीवन झाले असून आमदार रोहित पाटील गटाला मोठा धक्का पसला आहे.
कवठेमहांकाळात अजितराव घोरपडेंचा झेंडा
कवठेमहांकाळ गटात अजितराव घोरपडे यांनी आमदार रोहित पाटील समर्थक तानाजी पाटील यांचा ३७ विरुद्ध ३३ मतांनी पराभव केला. मिरज तालुका गटातून अण्णासाहेब कोरे यांनी भाजपचे अनिल शेगुणशे यांचा ४७ विरुद्ध १९ मतांनी पराभव केला.
यापूर्वी आमदार विश्वजीत कदम, तानाजी पाटील, अमोल बाबर, देवराज पाटील, विराज नाईक, महेंद्र लाड, अपर्णा देशमुख, वर्षा सावंत, पूजा पाटील, नितीन होनराव, वैभव शिंदे, राहूल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, रणधीर नाईक बिनविरोध निवडून आले आहेत. (Gopichand Padalkar’s victory in Sangli District Bank)