Home » Blog » मुंबई उच्च न्यायालयाचा गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबरला घेण्याचे आदेश  

मुंबई उच्च न्यायालयाचा गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबरला घेण्याचे आदेश  

by प्रतिनिधी
0 comments
Election for the post of Gokul chairman on November 10

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबरला घेण्याचे आदेश मुंबई उच्च  न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सहकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडून आलेल्या २५ संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. दीपावली पाडव्याच्या शुभमुहुर्ताला गोकुळला नवा अध्यक्ष मिळणार का याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे. (Election for the post of Gokul chairman on November 10)

२५ संचालकांना नोटीस काढण्याचे आदेश

गोकुळ अध्यक्षपदासाठी बोलवण्यात आलेली २९ ऑक्टोबरची सभा निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांनी  कोरमअभावी तहकूब होती. त्यानंतर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सोमवारी तीन तास सुनावणी झाली. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील संचालकांच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने १० नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडून आलेल्या २५ संचालकांना नोटीस काढण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मागील दरवाजाने स्वीकृत आणि शासनियुक्त चार संचालकांचा घुसवण्याचा महायुतीचा प्रयत्न थांबला गेला आहे. (Election for the post of Gokul chairman on November 10)

दुसऱ्या सभेची तारीख का जाहीर का केली नाही.

समविचारी आघाडीकडून वकील आशुतोष कुंभकोणी यांच्याकडून युक्तीवाद करण्यात आला. तर महायुतीच्या चार संचालकांच्या वकीलांनी युक्तीवाद केला. आशुतोष कुंभकोणी यांनी संचालक निवडून आल्यानंतर १५ दिवसात अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया पूर्ण होणे सहकारी कायद्यानुसार बंधनकारक असल्याचे मत मांडले. सहकार निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा अधिकार हा सहकार आयुक्तांचा आहे असा जोरदार युक्तीवाद केला. अभय कुंभकोणी यांनी देवराज खटल्याचा संदर्भ युक्तीवादात दिला. सहकार कायद्यानुसार १५ दिवसात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. पहिली निवडीची सभा तहकुब झाल्यानंतर दुसऱ्या सभेची तारीख का जाहीर केली नाही असा प्रश्न न्यायालयाने सहकार निवडणूक आयोगाला केला. (Election for the post of Gokul chairman on November 10)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!