नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सहा प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवारांना वगळून सातही नेत्यांनी अमित शाह यांची भेट घतल्याने राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. सातही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केली असून राष्ट्रवादीला राज्याचे अर्थमंत्री पुन्हा मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे. (Key leaders of the NCP met with Amit Shah)
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजी सुरू असल्याची चर्चा आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. पण काल रविवारी रात्री अचानक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आमदार दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वगळून सात नेत्यांनी भेट घेतल्याने राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी रणनिती, पक्षांतर्गत विषयावर चर्चा झाल्याची शक्यता होत आहे. (Key leaders of the NCP met with Amit Shah)
पुणे, नागपूर,औरंगबाद विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा पराभव झाल्याने त्याबाबतही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या अर्थमंत्र्यांची धुरा मुख्यमंत्री फडणवीस सांभाळत आहेत. हे पद राष्ट्रवादीला पुन्हा मिळावे अशी मागणी पक्षांकडून होत आहे. त्याबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच मंत्रीमंडळात धनंजय मुंडे यांचे पुनर्वसन होण्याच्या शक्यतेने जोर धरला आहे. दिलीप वळसे पाटील यांचीही मंत्रीमंडळात समावेश होण्याची चर्चा रंगली आहे. (Key leaders of the NCP met with Amit Shah)