Home » Blog » राज्यपाल दुष्यंत कुमारांना हटवा; अंकिता भंडारीच्या पालकांची मागणी

राज्यपाल दुष्यंत कुमारांना हटवा; अंकिता भंडारीच्या पालकांची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
(Ankita Bhandari's parents demand the removal of Dushyant Kumar)

कोल्हापूर : प्रतिनिधी : सिक्किमचे नवनियुक्त राज्यपाल दुष्यंत कुमार गौतम यांना हटवा अशी मागणी अंकिता भंडारीच्या पालकांनी केली आहे. अंकिता भंडारीने रिसॉर्टवर दुष्यंत कुमारांना व्हीआयपी ट्रीटीमेंट देण्यास नकार दिल्याबद्दल तिची हत्या करण्यात आली होती, असा आरोप अंकिताच्या आई वडिलांनी केला आहे.  हत्येतील प्रमुख आरोपी पुलकित हा भाजप नेत्याचा मुलगा होता. कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. (Ankita Bhandari’s parents demand the removal of Dushyant Kumar)

केंद्र सरकारने नुकतीच काही राज्यामंध्ये नवीन राज्यपालांनी नियुक्ती केली आहे. सिक्कीमचे राज्यपालपदी दुष्यंत कुमार यांची नियुक्ती झाल्यानंतर अंकिता भंडारीच्या पालकांनी इंडिया गेटसमोर दूष्यंत कुमारांना राज्यपाल पदावरुन हटवा मागणीसाठी आंदोलन सुरू केले. आज गुरुवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी अंकिताचे आई वडील, काँग्रेसचे नेते आणि इतर आंदोलकांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका केली. न्याय मिळवण्यासाठी एकत्र आलेल्या आंदोलकांनी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काल बुधवारी अंकिताच्या आई वडीलांची आंदोलनस्थळी राहूल गांधी आणि प्रियांका गांधींनी भेट दिली होती. अंकिताच्या हत्येप्रकरणी सीबीआयचा तपास पूर्णहोईपर्यंत दूष्यंत कुमारांची नियुक्ती स्थगित करावी अशी मागणी आंदोलकांची होती. (Ankita Bhandari’s parents demand the removal of Dushyant Kumar)

काय आहे अंकिता हत्येचे प्रकरण

अंकिता ही ऋषिकेशमधल वनंत्रा रिसॉर्ट मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. १९ वर्षी अंकिताची १८ सप्टेंबर २०२२ मध्ये हत्या झाली होती. तिचा मृतदेह चिल्ला कालव्यात सापडला होता. हत्येप्रकरणी पोलिसांनी पुलकीत आर्य, दोन कर्मचारी, सौरभ भास्कर, अंकिता गुप्ता यांना अटक केली होती. पुलकीत आर्य हा भाजपचे नेते विनोद आर्य यांचा मुलगा होता. हत्येनंतर विनोद आर्य यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. पुलकित आर्यने दुष्यंत कुमारांशी शारीरिक संबध ठेवावेत यासाठी अंकिता भंडारीवर दबाव आणला होता. तिने शरीर संबध ठेवण्यास नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आली होती. एका व्हीआयपीला ट्रीटमेंट द्यावी यासाठी अंकिता दबाव आणला होता हा व्हीआयपी म्हणजे दुष्यंत कुमार होते असा आरोप अंकिताच्या पालकांनी केला आहे. दुष्यंत कुमार यांचा या प्रकरणाशी संबध आहे असा आरोप अंकितांच्या आईवडिलांनी केला आहे.  (Ankita Bhandari’s parents demand the removal of Dushyant Kumar)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!