Home » Blog » शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची व्याप्ती मराठवाडा, विदर्भात वाढवणार

शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची व्याप्ती मराठवाडा, विदर्भात वाढवणार

by प्रतिनिधी
0 comments
'Shaktipeeth' agitation has now spread to Marathwada and Vidarbha

कोल्हापूर: प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गास कडाडून विरोध करण्यासाठी अखेर १३ जिल्ह्यांतील ‘शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापूर येथे  नुकतीच पार पडली. या  बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थित होती. . या बैठकीत सरकारच्या दडपशाहीविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला असून, आंदोलनाची व्याप्ती आता मराठवाडा आणि विदर्भात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आगामी काळात शक्तीपीठ महामार्गाचा वाद चिघळण्याची आणि सरकार विरुद्ध शेतकरी असा तीव्र संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. (‘Shaktipeeth’ agitation has now spread to Marathwada and Vidarbha)

शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या गळ्याखाली रेटण्याचा प्रयत्न

बैठकीत बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि राज्य सरकार सर्व कायदे धाब्यावर बसवून पोलिस बळाचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या गळ्याखाली रेटण्याचा प्रयत्न करत आहे. “शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध आहे. तरीही कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता, जबरदस्तीने जमिनीची मोजणी आणि संपादन करण्याचे बेकायदेशीर प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

पोलिसांशी दोन हात करुन असहकार्याची भूमिका घ्यावी

आमदार जयंत पाटील म्हणाले कि यापुढे ज्या ज्या गावांमध्ये प्रशासन जमिनीची मोजणी करण्यासाठी येईल, त्या सर्व गावांमध्ये संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी स्वतः मोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहून ते केवळ शेतकऱ्यांना कायदेशीर व धोरणात्मक मार्गदर्शन करणार नाहीत, तर वेळप्रसंगी प्रशासनाशी व पोलिसांशी दोन हात करून असहकार्याची भूमिका घ्यावी असा थेट इशारा  दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन मोजू दिली जाणार नाही, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. (‘Shaktipeeth’ agitation has now spread to Marathwada and Vidarbha)

लातूर, हिंगोलीतून आंदोलन होणार

आमदार सतेज पाटील म्हणाले कि पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेला हा लढा आता संपूर्ण राज्यभर पसरवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात प्रचंड मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. याची सुरुवात लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांतून होणार असून, येथे शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य ‘एल्गार मेळावे’ आणि आंदोलने आयोजित केली जाणार आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारला हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले जाईल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

     या बैठकीस कॅाम्रेड धनाजी गुरव , कॅा. गिरीश फोंडे , बी जी पाटील काका , रणजित पाटील , प्रकाश पाटील , के के पाटील यांचेसह १३ जिल्ह्यांतील शेतकरी प्रतिनिधी, संघर्ष समितीचे समन्वयक आणि मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (‘Shaktipeeth’ agitation has now spread to Marathwada and Vidarbha)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!