Home » Blog » दिल्ली पोलिसांनी विमानातच अभिजित दीपकेंना ताब्यात घेतले

दिल्ली पोलिसांनी विमानातच अभिजित दीपकेंना ताब्यात घेतले

by प्रतिनिधी
0 comments
Police took Deepke into custody right inside the aircraft

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य न्यायाधीश ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतवर आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलनासाठी मुंबईहून विमानाने दिल्लीत पोहोचल्यावर सीजीपेचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह आशुतोष रांका, सौरव दास यांना विमानातच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच युट्यूबर ध्रुव राठीलाही गुरुग्राममधून ताब्यात घेतले. दिल्लीमध्ये ४० हजार पोलिस तैनात केले असून रस्त्यांवर आंदोलकांची वाहने रोखण्यासाठी टायर किलर अंथरण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण दिल्ली शहरावर ड्रोनची नजर राहणार असून पोलिस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. ( Police took Deepke into custody right inside the aircraft)

दिल्लीतील सीजीपेचे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार तयारी केली आहे. जंतरमंतरवर आज शनिवारी आंदोलनाची हाक दिली होती. मुंबईहून अभिजीत दीपके आपल्या सहकाऱ्यांसह विमानाने दिल्लीला आले. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी विमानाकडे धाव घेतली. विमानातून उतरण्यापूर्वीच त्यांना विमानात ताब्यात घेण्यात आले. विमानतळाबाहेर सीआयएसएफच्या जवानांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ च्या घोषणा देण्यात आल्या. ( Police took Deepke into custody right inside the aircraft)

जंतरमंतवर येण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासून ५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. सीजीपीचे कायदेशीर सल्लागार रत्ना सिंह, यूट्युबर ध्रुव राठी यांनाही ताब्यात घेतले. ध्रुव राठी यांनी सीजीपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सीजीपीचे आंदोलन होऊ नये यासाठी ४० हजार जवान तैनात केले आहेत. संपूर्ण शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेटस् उभारले आहेत. वाहनांना रोखण्यासाठी टायर किलरची व्यवस्था केली आहे. पोलिसांच्या गणवेषावर बॉडी कॅमेरे लावले आहेत. महिला आंदोलकांना रोखण्यासाठी पिंक फोर्सची निर्मिती केली आहे. दिल्लीतील ४५ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत. ( Police took Deepke into custody right inside the aircraft)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!