पुणे : प्रतिनिधी : संविधानाचे नाव घेऊन देशात अराजकता निर्माण करण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिले आहे. याचा कोणी दुरुपयोग केला तर त्याचे हात जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांना सर्वात प्रिय असलेले मुलभुत अधिकार संपवण्याचे काम काँग्रेसने केले होते. आज जे लाल संविधान घेऊन फिरत आहेत पण त्यामध्ये माओवाद आहे. छात्रो की गुंज नसून झुट की गुंज आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहूल गांधींवर टीका केली. (Fadnavis criticizes Rahul Gandhi)
पुणे येथे भाजप कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी फडणवीसांनी राहूल गांधीवर हल्लाबोल करत त्यांच्या भाषणातील २९ मुद्दे खोटे आहे असल्याचा आरोप केला. कर्नाटकातील छात्रो की गुंज कार्यक्रमात राहूल गांधी मांडलेल्या ४० मुद्द्यापैकी २९ मुद्दे कसे खोटे आहेत हे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुलींनी काढले आहेत. तिने झुट की गुंज नावाची वेबसाईट सुरू केली. त्या वेबसाईटवर राहूल गांधी कसे खोटे बोलत आहेत हे सांगितले म्हणून तिच्यावर कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल केला आहे, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले. (Fadnavis criticizes Rahul Gandhi)
सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम आहे अशी टीका फडणवीसांनी केली. सीजेपी मध्ये चार ते पाच मुले दिसतात पण त्यांच्या मागे भारत जोडो आंदोलनात १८० संघटनांतील लोक आहेत. ज्यांनी लोकसभेत फेक नॅरटिव्ह पसरवला तेच आता नवीन नाव घेऊन मैदानात उतरले आहेत अशी टीका फडणवीसांनी कॉक्रोज जनता पार्टीवर केली.
राम मंदिर दानपेटीत घोटाळा झाला आहे. पण दानपेटीत १८०० कोटींचा घोटाळ्याचा आकडा कुठुन आला असा सवाल त्यांनी केला. हिंदूत्वाला विरोध करता येत नाही म्हणून हिंदू कसे चुकीचे आहेत, हिंदूमध्ये काय चुकते आहे हे दाखवतात. यापुढे विरोधकांचे लक्ष्य कुंभमेळा असून त्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे. (Fadnavis criticizes Rahul Gandhi)