Home » Blog » १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या

१० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या

by प्रतिनिधी
0 comments
Atrocities against ten-year-old girls in Junnar

पुणे : प्रतिनिधी : दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात घडली. आळेफाटा पोलिसांनी २५ वर्षाच्या युवकाला अटक केली आहेत. गावात संतापाची लाट उसळली आहे. (Atrocities against ten-year-old girls in Junnar)

मिळालेल्या माहितीनुसार मुलगी चौथीत शिकत होती. ती आजारी असल्याने शाळेत गेली नव्हती. दुपारच्या सुमारास पालक नसल्याने संधी साधून युवकाने मुलीला शेतात नेले व तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी दुपारी घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी बराचवेळ मुलगी घरी न परतल्याने तिचा शोध घेतला असता शेतात मृतदेह आढळला. शोध कार्यात संशयित युवकानेही सहभाग घेतला होता. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि तपास सुरू केला.  पिडित मुलीच्या शेजारी राहत असलेल्या युवकाच्या वर्तनावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पण्ण झाले. या घटनेने मुलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.  (Atrocities against ten-year-old girls in Junnar)

पिंपळवंडी हे गाव जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे आहे. त्यांच्याच गावात घटना घडल्याने पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. पुणे जिल्ह्याचे अधीक्षक उपस्थित तपासाचा आढावा घेत आहेत. (Atrocities against ten-year-old girls in Junnar)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!