Home » Blog » दोन भावांचा तिसऱ्या भावावर हल्ला; वडील-मुलगा ठार

दोन भावांचा तिसऱ्या भावावर हल्ला; वडील-मुलगा ठार

by प्रतिनिधी
0 comments
Two brothers attack a third brother

मुंबई : प्रतिनिधी : पहाटेच्यावेळी गाणी लावण्याच्या कारणांवरुन झालेल्या वादावादीत दोन सख्ख्या भावांनी तिसऱ्या भावाच्या कुटुंबांवर हल्ला केला. त्यामध्ये तिसरा भाऊ आणि त्यांचा मुलगा ठार झाला. मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईट परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. (Two brothers attack a third brother)

विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहूल नगरात विश्वकर्मा कुटुंबातील तिघे भाऊ एकत्रित राहतात. दोन भाऊ पोटमाळ्यावर राहतात तर एक भाऊ खालच्या मजल्यावर रहात होता. सुनील विश्वकर्मा (वय ४०) याने पहाटेच्या सुमारास घरात गाणी लावली होती. गाण्याचा आवाज खूप मोठा असल्याने इतरांना त्रास होत होता. त्यामुळे सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघां भावांनी सुनीलला गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितले. यावर त्यांच्या वाद झाला. हा वाद इतका पेटला की त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. भांडणे मिटवण्यासाठी कुटुंबातील अन्य सदस्यही मध्ये पडले पण वाद टोकला पोचला. त्यात सुरेंद्र आणि सुरज यांनी सुनील आणि त्यांच्या कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सुनील जागीच ठार झाला तर त्याचा मुलगा श्लोक (वय १४) हा गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. सुनीलची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि मुलगा विवाह हे ही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Two brothers attack a third brother)

पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरेंद्र आणि सुरज या दोघां भावांना ताब्यात घेऊन अटक केली. हा वादा गाण्याच्या कारणावरुन झाला की कौटुंबिक होता यांचा पोलिस तपास करत आहेत. (Two brothers attack a third brother)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!