Home » Blog » अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

by प्रतिनिधी
0 comments
Ajinkya Rahane retires from international cricket

मुंबई : प्रतिनिधी : मधल्या फळीतील भरवशाच्या अनुभवी खेळाडू ३८ वर्षीय अजिंक्य रहाणे याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मिडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत त्याने निवृत्ती जाहीर केली. मुंबई रणजी संघातून खेळणाऱ्या या खेळाडूंने कसोटी, वनडे, टी-२० आयपीएल मध्ये आपल्या खेळाची छाप पाडली होती. (Ajinkya Rahane retires from international cricket)

निवृत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ

निवृत्तीची घोषणा करताना सोशल मिडियावर अजिंक्य रहाणे म्हणाला. जीवनातील प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि एक शेवटही. तो क्षण आला की त्याचा सन्मान करून पुढे जाणं गरजेचं आहे. माझ्या फलंदाजीप्रमाणेच मी योग्य वेळेवर नेहमी विश्वास ठेवला आणि आज मला वाटतं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.”

रहाणेच्या नेतृत्वाखाली बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली

२०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताने अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असताना कोहलीने जुन्या नव्या खेळाडूंना उत्साहित ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर धूळ चारत इतिहास रचला होता. अजिंक्य रहाणेची ही कर्णधारपदाची छोटी कारकीर्द भारतीयांच्या स्मरणात कायम राहिली आहे. (Ajinkya Rahane retires from international cricket)

परदेशातील मैदानावर शतके

अजिंक्य रहाणे एकेकाळी विराट कोहली,चेतेश्रवर पुजारा यांच्यासमवेत मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू होता. पण घसरत्या फॉर्ममुळे तो संघातून बाहेर फेकला गेला. भारताकडून कसोटी, एकदिवसीय सामन्यता त्याने शतके झळकावली आहेत. लॉर्डस् , मेलबर्न, जोहान्सबर्ग, वेलिंग्टन, किंग्स्टन या परदेशातील मैदानावर त्याने शतके झळकावत आपल्या शैलीदार खेळीचे प्रदर्शन घडवले होते. काही वेळा धडाकेबाज खेळ करुन चकित करायचा.  

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

अजिंक्य रहाणेची आंतररराष्ट्रीय कारकीर्द, अजिंक्यने भारताकडून ८५ कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व करताना ५०७७ धावा केल्या. त्यामध्ये १२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. १८८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

९० एकदिवसीय सामने खेळणाऱ्या अजिंक्यने २९६२ धावा जमवल्या. त्यामध्ये तीन शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश होता. १११ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. अजिंक्यला अवघे टी-२० चे अवघे २० सामने खेळायला मिळाले. त्यामध्ये ३७५ धावा त्याने केल्या. एक अर्धशतक झळकावले असून ६१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. २१२ आयपीएल सामने तो खेळला आहे. (Ajinkya Rahane retires from international cricket)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!