ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताने एका सुवर्ण पदकासह तीन रौप्य पदके पटकावली. काल मिराबाई चानू सुवर्णपदक पटकावले तर आज ज्ञानेश्वरी यादव आणि मुथुपांडी राजा आणि ऋषिकांत सिंगनेही रौप्य पदक पटकावले. ग्लासगो येथे ही स्पर्धा सुरू असून वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूंना आपला दबदबा कायम ठेवला. (Gold for Chanu in weightlifting)
राष्ट्रकुलमध्ये मीराबाई चानूची हॅटट्रिक
मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधत नवीन इतिहास रचला. महिलांच्या ४८ किलो गटात तिने सुवर्ण पदक मिळवले. क्लिन आणि जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात तिने १०५ किलो वजन नवीन विक्रम साधला. तिने १९० किलो वजन उचलले. टोकियो ऑलिपिंकमध्ये तिने रौप्य पदक पटकावले होते. (Gold for Chanu in weightlifting)
ज्ञानेश्वरीला रौप्य
५३ किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी यादवने स्नॅचमध्ये ८८ किलो वजन उचलून दुसरे स्थान मिळवले. नायजेरियाच्या ओनोमे दिदिहने ९३ किलो वजन उचलून आघाडी घेतली आणि सुवर्णपदक पटकावले. कॅनडाची गौल्कस ८३ किलो वजनासह तिसऱ्या स्थानी राहिली. २३ वर्षी ज्ञानेश्वरी छत्तीसगडमधील भोंडिया गावची आहे. (Gold for Chanu in weightlifting)