Home » Blog » लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक

by प्रतिनिधी
0 comments
Fetal sex determination test at a lodge

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या सीमेवरील कळंबा येथे लॉजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुख्य संशयित फरार आहे.  करवीर पोलिस ठाण्याने ही कारवाई केली. (Fetal sex determination test at a lodge)

पोलिसांनी कारचा पाठलाग करुन महिलेला ताब्यात घेतले

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या कारवाईची माहिती दिली. कळंबा येथील थ्री स्टार लॉज येथे स्वप्निल केरबा पाटील हा एजंटामार्फत आलेल्या महिलांना गर्भलिंग चाचणी करत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ताबडतोब थ्री स्टार लॉजवर छापा टाकण्यास गेले असताना या गुन्ह्यातील मुख्य संशयित स्वप्निल पाटील हा गर्भलिंग चाचणी करुन लॉजमधून बाहेर पडला आणि कारने वेगाने निघून गेला.  पोलिस पथकाने त्यांचा कारचा पाठलाग सुरू केला असताना केरबा पाटील याने कार थांबवून त्याच्या कारमध्ये असलेल्या महिलेला उतरवून वेगाने कार पळून गेला.

दोन महिला एजंटांना अटक, सात जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी संबधित महिलेकडे चौकशी केली असता तिला एजंट मनिषा दिनक कांबळे (वय ३७, रा. सावर्डे पाटण, ता. राधानगरी) हिने केरबा पाटील यांच्याकडे गर्भलिंग चाचणीस घेऊन आल्याचे सांगितले. तसेच आणखी दोन महिलांची गर्भलिंग चाचणी झाल्याची माहिती संबधित महिलेने दिली. अन्य दोन महिलांना एजंट अश्विनी गजानन शिंदे (वय ३८, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) लॉजवर घेऊन आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी एजंट कांबळे आणि शिंदे यांना दोघांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यामध्ये किरण चव्हाण आणि संतोष कोळी अशी आणखी दोन एजंटांची नावे निष्पण्ण झाली. लॉज उपलब्ध करुन देणाऱ्या थ्री स्टार लॉजमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Fetal sex determination test at a lodge)

पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली उप निरीक्षक कळकुटे, सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहूल देसाई, सोमराव पाटील, लखन राजगुरू, पोलिस कॉन्स्टेबल रेखा माने, अविनाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांचा कारवाईत सहभाग होता. (Fetal sex determination test at a lodge)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!