पाटणा : नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन काबूत आणण्यासाठी बिहार पोलिस दलातील कर्मचाऱ्यांने चक्क एके-४७ चा वापर केला. या पोलिसांने एके-४७ मधून फायरिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सावत्रिक टीकेनंतर सिवान पोलिस ठाण्यात एका जवानाला निलंबित करण्यात आले आहे. २५ जुलैला ही घटना घडली. (Police open fire with AK-47s during student protest)
सिवानमध्ये एके-४७ मधून गोळीबार
दिल्लीत विद्यार्थ्यांचे शांततेत आंदोलन सुरू होते. त्याचवेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभर आंदोलन झाले. बिहारमध्येही मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २२ ते २५ कालावधीत मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यांवर उतरले. काही ठिकाणी विद्यार्थी हिंसक झाल्यावर त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. अश्रूधुरांची नळकांडी फोडण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी हवेत फैरीही झाडण्यात आल्या. सिवानमध्ये दगडफेक करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका जवानाने थेट एके-४७ ने हवेत गोळीबार केला. एके-४७ मधून सेंकदाला मोठ्या संख्येने गोळ्या सुटतात. या गोळ्या जर विद्यार्थ्यांना लागल्या असत्या तर मोठी जिवितहानी झाली असती. या घटनेची गंभीर दखल घेऊन सिवानमधील जवानाला निलंबित करण्यात आले. (Police open fire with AK-47s during student protest)
२०० विद्यार्थ्यांना अटक
दरम्यान आंदोलनात २०० हून विद्यार्थ्यांना अटक केली. चोवीस तासांहून अधिक काळ विद्यार्थी कोठडीत होते. विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी वकिल पुढे आलेत आहेत. २५ जुलै रोजी पकडण्यात आलेल्या ५८ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यातील अनेक विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्याच्या करिअरवर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
५८ पोलिस कर्मचारी जखमी
बिहारमधील सारणमध्ये ५६, सिवानमध्ये २५, भागलपूरमध्ये ४१, सीतामढी आणि जहानाबादमध्ये १३ जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दंगेखोरांनी १९ सरकारी वाहने आणि एका खासगी वाहनाची तोडफोड करण्यात आली. ५८ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. (Police open fire with AK-47s during student protest)